फोटो : B05096
डीजीपीनगर : फराळ व साडीवाटप कार्यक्रमास उपस्थित नगरसेविका संध्या कुलकर्णी यांच्यासह मान्यवर.
--
वंचित अन् गरजवंतांसोबत दिवाळीचा आनंद
डीजीपीनगर, ता. १७ : डीजीपीनगर परिसरातील विविध संस्थांतर्फे भोकरवाडी व राजेवाडा येथील पाड्यांवर दिवाळी फराळ व साड्यांचे वाटप करण्यात आले. ३२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही माणुसकीची परंपरा यंदाही उत्साहात जपण्यात आली.
डीजीपी नगर-१ हाउसिंग सोसायटी, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सार्वजनिक उत्सव समिती, निरामय ज्येष्ठ नागरिक संघ, आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि वंदे मातरम् प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. भाऊबीजेनंतर परिसरातून फेरी काढून नागरिकांकडून फराळ व साड्यांचे संकलन करण्यात आले आणि त्यानंतर पाड्यांवर जाऊन स्थानिक कुटुंबांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका संध्या कुलकर्णी व वैभव कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची जपणूक करणाऱ्या या उपक्रमात अरुण दोंदे, बापूसाहेब कुलकर्णी, भगवान शिंदे, रवी पाटील, पद्माकर देशपांडे, उत्तम पाटील, रामदास पाटील, संपत गाडे, अतुल करंजे, वैशाली पिंगळे, प्रतिभा भामरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.