नाशिक

आमदार चंद्रकांत रघुवंशींची विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी

CD
फोटो : 34501 नंदुरबार : दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना आइस्क्रीमचे वाटप करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी. ----------------- आमदार चंद्रकांत रघुवंशींची विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन नंदुरबार, ता. ५ : दिवाळीच्या सुट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली. या वेळी ३०० विद्यार्थ्यांना आइस्क्रीमची मेजवानी देऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्यांचा सदुपयोग करावा, अभ्यासासोबतच विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे तसेच फटाके फोडताना योग्य ती काळजी घ्यावी. पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधता यावा, या उद्देशाने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या प्रांगणात सुमारे ३०० विद्यार्थ्यांना आइस्क्रीमचे वाटप केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधत त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. तसेच दिवाळी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचा संदेश दिला. दरम्यान, आमदार रघुवंशी यांच्याकडून मिळालेल्या आइस्क्रीममुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आइस्क्रीमचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, नगरसेवक, कमल ठाकूर, नगरसेवक नगरसेवक पप्पू गिरासे, आकाश अहिरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : बॅलेट पेपर वापरूनही काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, तर तुमची मागणी मागे घ्याल का? - अश्विनी वैष्णव

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT