नाशिक

दिवाळी विशेष पुरवणीसाठी लेख क्रमांक १

CD
दिवाळी विशेष पुरवणीसाठी मुख्य लेख (समर्पक छायाचित्र किंवा दीपावलीचे संग्रहित चित्र वापरावे) --- शीर्षक दीपावली : परंपरा, श्रद्धा अन् समृद्धीचा प्रकाशोत्सव लीड.. लक्ष्मीपूजनातून सुख-समृद्धीची कामना, बलिप्रतिपदेतून बळिराजाच्या उदार आणि प्रजाहितदक्ष राज्याचे स्मरण, तर दीपदानातून अंधारावर प्रकाशाचा विजय...अशा धार्मिक, पौराणिक आणि सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम म्हणजे दीपावली! या उत्सवाला प्रत्येक प्रदेशाने आपापल्या लोकपरंपरांची वेगळी झालर दिली आहे. दिव्यांची आरास, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा आणि विविध प्रथा-परंपरांतून भारतीय संस्कृतीचे वैभव या सणात पाहायला मिळते. - द्वारकाधीश दिगंबर जोशी, जळगाव ------------- लक्ष्मीपूजन - आश्विनी अमावस्या. प्रातःकाळी मंगल स्नान अभ्यंग करून देवपूजा, दुपारी भोजन आणि पूजा प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी मंत्र व विष्णु मंत्र म्हणून देवता पूजन व कुबेर यांची सुद्धा समंत्रक पूजा असा या दिवसाचा विधी आहे. त्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या तुरुंगातून सोडविले आणि त्यानंतर सर्व देव समुद्रात जाऊन निद्राधीन झाले, असा उल्लेख आहे. अष्टदल कमल किया स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. मग पुढील मंत्राने तिची पूजा करतात. नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरेः प्रिया । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात् ।। अर्थ - (हे लक्ष्मी) तू सर्व देवांना वर देणारी व विष्णूला अति प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते. ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून पुढील मंत्राने ध्यान करतात. धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ।। त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची व साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धणे, गूळ, साळीच्या लाह्या बत्तासे, इ. पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. पुराणांत सांगितले आहे, की आश्विनी अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरुष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदा. या रात्री बळीची पूजा करावयाची असते. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी. त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा व बळीची प्रार्थना करावी. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम संवंताचा वर्षारंभादिन मानला जातो. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंग स्नान केल्यावर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. दुपारी गोड धोड भोजन करतात. दिवाळीतला हाच दिवस प्रमुख समजला जातो. या दिवशी लोक नवी वस्त्राभरणे लेवून सर्व दिवस घालवतात. या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. पार्वतीने शंकराला याच दिवशी द्यूतात हरविले होते. त्यावरून या प्रतिपदेला द्यूतप्रतिपदा असेही नाव मिळाले आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी-बैलांना सजवून त्यांचीही पूजा करतात व मिरवणूक काढतात. दिवाळीत आकाशदिवे लावण्याची प्रथा आहे. आश्विन शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत शिव, विष्णू, यम इ. देवता व पितर यांच्यासाठी आकाशदीप लावावे, त्यामुळे भाग्य व लक्ष्मी प्राप्त होते, अशी भावना आहे. भारतीय वाङमयात दीपावलीचे उल्लेख आलेले आहेत. वात्स्यायनाच्या कामसूत्रात यक्षरात्री नामक उत्सवाचा उल्लेख आहे. हेमचंद्राच्या मते यक्षरात्री म्हणजे दीपालिका उत्सव होय. श्रीहर्षाच्या नागानंद नाटकातील दीपप्रतिपदुत्सव म्हणजेही दीपावलीचाच उत्सव आहे. नीलमत पुराणात त्याला दीपमाला उत्सव असे नाव दिले आहे. यशस्तिलकचंपूत दीपोत्सवाचे वर्णन केलेले आहे. ते दीपावलीच्या उत्सवाशी जुळते आहे. इ.स.च्या ११ च्या शकातील श्रीपती नामक ज्योतिषाचायनि आपल्या ज्योतिष रत्नमाला या ग्रंथावरील मराठी टीकेत दिवाळी हा शब्द वापरला आहे. ज्ञानेश्वरी व लीळाचरित्र या ग्रंथातही दिवाळी हा शब्द अनेकदा आढळतो. यशोधराने कामसूत्रावरील टीकेत यक्षरात्री म्हणजेच सुखरात्री असे सांगून, तिचा यक्षपूजा व द्यूतक्रीडा यांच्याशी जोडता आहे. वराह पुराणातही कार्तिक शुद्ध प्रतिपदेला यक्षाची पूजा होत असल्याचा उल्लेख सापडतो. कुबेर हा राजा, त्याचप्रमाणे धनदेवही मानला जातो. गुप्तयुगात संप्रदायाच्या प्रभावामुळे कुबेराच्या पूजेऐवजी तक्ष्मीजिनाचे महत्त्व वाढत गेले असावे. सामाजिक स्वरूप काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व सात दिवाळीच्या उत्सवाचे स्वरूप सारखेच असते. घरे स्वच्छ झाडून, सारवून, रंगवून आणि फुलांच्या माळा, पताका, तोरणे वगैरे लावून सुशोभित करणेः अभ्यंगस्नान करून मौल्यवान वस्त्रालंकार धारण करणे; आप्तेटांसह मिष्टान्न भोजन, दिव्यांची रोषणाई, लक्ष्मीपूजन, दीपदान मनोरंजक खेळ, इ. कार्यक्रम सर्वत्र होतात. याशिवाय, प्रत्येक प्रदेशाची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. गुजरातेत आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला वाघवारान म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढतात. त्यात वाघाचे चित्र हमखास असते. ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात. धनत्रयोदशीला घरातील द्रव्य, अलंकार, इत्यादींची पूजा करतात. आश्विन वद्य चतुर्दशीला रूपचतुर्दशी म्हणतात. त्या दिवशी लवकरच स्नान करतात व शृंगार करतात मात्र त्या रात्री भुते खेते सर्वत्र संचार करतात, अशी समजूत आहे. त्यामुळे लोक सामान्यपणे रात्री घराबाहेर जात नाहीत. त्या रात्रीला काळरात्र असे म्हणतात. बरेच लोक त्या रात्री शेंदूर व तेल लावून हनुमानाची पूजा करतात. आमावस्या हा दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस मानतात. त्या दिवशी महाकाली महालक्ष्मी व महा सरस्वती या देवतांची पूजा करतात. दौत, रुपया आणि वही ही त्यांची प्रतिके मानली जातात. नवीन जमाखर्चाच्या वहीच्या तिसऱ्या पानावर श्री हे अक्षर लिहून त्यावर एक विड्याचे पान व एक रुपया ठेवतात. नंतर त्या वहींची पंचोपचार पूजा करतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला काळभैरवाची पूजा करतात. सकाळी लहान मुले मिठाची पुरचुंडी घेऊन गावात हिंडतात, वर्षेरंभाच्या शुभशकुनाप्रीत्यर्थ लोक त्यांच्याकडून मीठ विकत घेतात. राजस्थान राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला. त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही नुकसान केले, तरी तिला मारीत नाहीत. दिवाळीतील चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. सायंकाळी मुली मस्तकावर ''घुडल्या घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो, हा मुळात दीपपूजेचाच एक प्रकार आहे. खेखराच्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते, त्याच दिवशी नवीन वर्षासाठी नवीन वह्यांत जमाखर्च मांडण्यास प्रारंभ करतात. पंजाब पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिवाळीचा दीपोत्सव करतात. तिथले शिख तोकही अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या स्थापनेचा स्मृतिदिन म्हणून हा सण पाळतात. उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागातले तोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. त्या वेळी दुसऱ्या गावातला कोणी मनुष्य तिथे आला, तर त्याला शिव्या देतात; कारण तसे करणे पुण्यप्रद मानले जाते. सिंध सिंधी बांधव दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात, नंतर तलावाच्या काठची माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर काटेरी वृक्षाची फांदी रोवून तिची पूजा करतात. मग त्याच चबुतऱ्याची थोडी माती ते घरी नेतात. दुसऱ्या दिवशी त्या मातीचे सोने होते. अशी समजूत आहे. बंगाल बंगालमध्ये लक्ष्मीपूजनापेक्षा कालीपूजनाला विशेष महत्त्व आहे. आश्विनी अमावास्येच्या रात्री बंगाली लोक कालीची स्तोत्रे गात जागरण करतात. त्या रात्रीला ते महानिशा म्हणतात. काली हीच लक्ष्मी, सरस्वती व शक्ती होय, अशी त्यांची धारणा असते. नेपाळ नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसांत द्युतक्रीडेला विशेष उधाण येते. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच शिवाय कुंचे, गायी, बैल यांचीही पूजा करतात. गोवा गोव्यातली दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारीपाजारी एका जपून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. दक्षिण भारतात सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडू तमिळनाडूमध्ये काही लोक नरक चतुर्दशीता सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्रप्रदेश आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून बळिराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. काही ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत मशाली घेऊन नाच करण्याचीही प्रथा आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या नरकासुराची शेणाची आकृती करून तिच्यावर केरकचरा ओततात व त्या ढिगाऱ्यावर एक पैसा ठेवतात, या दिवशी नवी केरसुणी विकत घेतात, तिला लक्ष्मी म्हणतात, कारण ती अलक्ष्मीला झाडून टाकण्याचे काम करते. नगर जिल्हा नगर जिल्ह्यात दिवाळीला गुराखी कांदळाच्या पानाचा दिवटचा विणून सायंकाळी गुरांना ओवाळतात व गाणी म्हणतात. ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी अंगणात शेणाचा किंवा तांदुळाच्या पिठाचा बळिराजा काढून त्याची साक्षी पूजा करतात. बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्याभोवती एकवीस दिवे मांडण्याचीही प्रथा आहे. बळिराजा देवांचा शत्रू असला, तरी तो दुष्ट नव्हता. अतोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता याविषयी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य सुराज्य होते. म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावे, अशी आकांक्षा वरील लोकाचारांत प्रकट झालेली दिसते. चौकट सुख-समृद्धीचा उत्सव दिवाळीच्या दिवसांत मातीचे किल्ले बनवून त्यावर ऐतिहासिक देखावे व प्रसंग उभे करतात. दीपावली हा मुख्यतः दीपोत्सव आहे. घरातील भागात, कानाकोपऱ्यात तेलाचे दिवे लावून प्रकाशमय केले जाते. प्रत्येक वास्तूच्या बाहेरील भागात रांगा लावून ती उजळून टाकली जाते. उंच जागी आकाशदिवा लावून काळोख नाहीसा करण्याचा प्रयत्न असतो. सर्व सणांमध्ये दीपावलीचा सण अधिक लोकप्रिय आहे; कारण तो सुख-समृद्धीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. शेतकरी असो; उद्योगपती असो किंवा व्यापारी असोः प्रत्येक जण आपल्या वर्षभरातील कष्टांच्या कमाईचा उपभोग घेण्याच्या कल्पनेने दिवाळीचे हर्षभराने स्वागत करतो. लक्ष्मीला प्रसन्न करणे ही मानवाची मोठी आकांक्षा असते. दीपावलीच्या रूपाने ती साकार झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Faridabad Firing: धक्कादायक! कुत्र्याच्या विष्ठेवरून वाद; शेजाऱ्याने पिस्तुलातून झाडल्या १५ गोळ्या! टेक महिंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या

IND vs NZ: नमन धीरच्या विकेटवरून वाद! टीम सिफर्टच्या बाऊंड्रीवरील कॅचवर केएल राहुलही अंपायरला भिडला; नेमकं काय घडलं

MPSC Main Exams Uncertainty News : एमपीएससीच्या अनिश्चित कारभाराने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात!

Latest Marathi News Live Update: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ईडीची मोठी कारवाई

Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराची सुट्टी असतानाही बाजार का उघडतो? काय आहे मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा?

SCROLL FOR NEXT