फोटो : H34715
दीपोत्सवात रंगली सुरांची दिवाळी
सूर विश्वास मैफलीत दसककर भगिनींचे गायन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : सकाळच्या प्रसन्न प्रहरी, सूर्याच्या कोवळ्या किरणात, दीपावलीच्या आगमनाला शास्त्रीय सूरांची साथ लाभल्याने अविस्मरणीय सांगीतिक मैफल शनिवारी (ता. ७) रंगली. विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जलालपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सूर विश्वास’ या उपक्रमांतर्गत ‘सुरांची दिवाळी’ विशेष मैफील सावरकर नगर येथील विश्वास गार्डनमध्ये झाली.
शास्त्रीय संगीताच्या विविध रंगांची उधळण करीत दसककर भगिनींनी आपल्या गायनातून रसिकांना स्वरांच्या एका समृद्ध विश्वात नेले. मैफिलीची सुरुवात ईश्वरी दसककर- कदडी, अश्विनी दसकर- भार्गवे, गौरी दसककर- अपस्तंब, सूरश्री दसककर, डॉ. ज्ञानेश्वर कासार यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. राग ललत (शुद्ध धैवत), पूरिया धनाश्री रागांच्या सादरीकरणातून स्वरांची अलवार भावसौंदर्य उलगडत गेले. जसरंगी जुगलबंदी, आलाप, ताना, मूर्च्छना आणि सरगम यांच्या सुरेल मिलाफाने मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. दसकर भगिनींनी ‘राम राम भजो’ आणि ‘भाग्यदा’ रचना सादर केल्या तर, डॉ. ज्ञानेश्वर कासार यांनी ‘समाधी साधन’ ‘येई हो विठ्ठले’ रचनांमधून रसिकांना मुग्ध केले. पं. सुभाष दसककर यांनी संवादिनीवर साथ केली. शिवाय राग परमेश्वरीचे सादरीकरण केले. आलाप, जोड, ताना आणि तिहाई यांच्या माध्यमातून त्यांनी रागाचे स्वरवैभव उलगडले. सुजित काळे यांनी तबल्यावर साथ केली. तनया कोळी यांनी सहवादन केले. यावेळी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, प्राजक्त मेहता, अहमदाबाद बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन, सुनंदा सोहनी, रूपाली पैठणकर, प्रवीण धात्रक, किरण जोशी यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. डॉ. स्मिता मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.