पान-२ अँकर
फोटो : 08878
इगतपुरी : दिव्यांग समावेशित शिक्षणांतर्गत संसाधन कक्षात आकाशकंदील कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसह महेश वळवी, चिमाजी गोडे, बाळासाहेब मुंडे, सुरेश सोनवणे, मंजूषा साळुंखे, किशोर सोनवणे, प्रमोद चिंचोले.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले आकाशकंदील
समावेशित शिक्षण, पंचायत समितीचा दिवाळीनिमित्त उपक्रम
------------------------------
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. १ : दिव्यांग समावेशित शिक्षणांतर्गत संसाधन कक्ष शिक्षण विभाग, पंचायत समिती, इगतपुरी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने समावेशित शिक्षण, पंचायत समिती इगतपुरी यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून आकर्षक आकाशकंदील तयार केले. पणत्यांना सुबक रंगरंगोटी करून त्यांचे सुंदर सुशोभीकरण केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः पणत्यांना रंग दिले. तसेच विविध रंगसंगतींचा वापर करून आकाशकंदील साकारले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून तयार केलेल्या या कलाकृतींमधून त्यांच्यातील सुप्त कलागुण आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडले. समावेशित शिक्षणांतर्गत तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इगतपुरी येथे संसाधन कक्ष कार्यान्वित आहे. या कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापनासाठी मार्गदर्शन, पालक समुपदेशन तसेच शालेय साहित्य आणि विविध थेरपी सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने गटविकास अधिकारी महेश वळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी चिमाजी गोडे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंडे, पोषण आहार अधीक्षक सुरेश सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी मंजूषा साळुंखे, किशोर सोनवणे, प्रमोद चिंचोले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे कौतुक केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास तेही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हा उपक्रम यशस्वितेसाठी केंद्रस्तरीय विशेष शिक्षक उत्तम आंधळे, स्मिता खोब्रागडे, बाप्पा गतीर, संदीप शिरसाठ, संजय पाटील, निलाक्षी शेलार, सुरेखा जाधव, सविता लाडे यांनी प्रयत्न केले. बाळू गतीर यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------------------
कोट
दिवाळीच्या आनंदात दिव्यांग विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यात स्वावलंबनाची भावना निर्माण करणे, या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
- बाळासाहेब मुंडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, इगतपुरी
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.