नाशिक

भेटवस्तूंनी बाजारपेठ बहरली..!

CD
लोगो : तयारी दिवाळीची -- फराळ ते क्रॉकरी; दिवाळीनिमित्त ‘कस्टमाइज्ड’ गिफ्ट्सचा ट्रेंड भेटवस्तूंनी बाजारपेठ बहरली; डिझायनर पॅकिंगवर ग्राहकांचा भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १: भेटवस्तू देणे आनंदाचा सोहळा असतो. दिवाळीत आपल्या नातेवाईक, आप्तेष्टांना तसेच उद्योग व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची पध्दत पूर्वापार चालत आलेली आहे. यामध्ये सुकामेव्याचे विविध प्रकार, सुंगधी उटणे, तेल, साबण, अभ्यंग तेल, महिलांसाठी कस्टमाइज मेकअप किट, कमी ग्रॅममध्ये मिळणारी ज्वेलरी, चॉकलेट बुके, किचनमध्ये वापरली जाणारी क्रॉकरी, दीर्घकाळ टिकणाऱ्या मिठाईबरोबर फराळाच्या पदार्थांना भेटवस्तू म्हणून प्राधान्य दिले जात आहे. दिवाळीत भेटवस्तू देताना तिचा उपयोग होईल, अशा अनुषंगाने वस्तूंची निवड केली जाते. यामध्ये दरवर्षी सुकामेव्याला अधिक पसंती दिली जाते. सुकामेवा घातलेल्या वस्तूंची पॅकिंग करताना विक्रेत्यांकडून विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी खास बॉक्स डिझाईन केले जातात. त्यामध्ये खात्यांनुसार विविध प्रकारचा सुकामेवा तसेच काचेचे वा प्लॅस्टिकच्या छोट्या जारमध्ये सुकामेवा, फराळाचे पदार्थ, मिठाई ठेवली जाते. पॅकिंग करताना खास डिझायनर पिशव्या तयार करून घेतल्या जातात. गिफ्ट हॅम्पर, पोटलीप्रमाणे तयार पिशव्यांना खास गोंडा, विविध रंगामध्ये तयार करण्यात येतात. त्यांना विशिष्ट बॉक्समध्ये ठेवून गिफ्ट पेपरने पॅकिंग केली जाते. त्याला लेस लावून दिवाळीचा खास संदेश लिहिला जातो तर, काही ठिकाणी प्रत्येक भेटवस्तू व्यक्तीनुसार खास पत्रातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. या भेटवस्तू अगदी पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून मिळतात. पाचशे रुपयाच्या बॉक्समध्ये चार ते पाच प्रकारच्या वस्तू तर पाच हजारच्या बॉक्समध्ये पंधरा प्रकारच्या वस्तू ठेवल्या जातात. --चौकट भेटवस्तूचे प्रकार असे साधा कार्डबोर्ड बॉक्स (स्वतंत्र कप्पे), लाल सोनेरी प्रीमियम बॉक्स (विविध रंग, रिबन व सजावट), पारदर्शक झाकणाचा ट्रे (यातून वस्तू दिसतात), लाकडी बॉक्स (अधिक आकर्षक व पुन्हा पुन्हा वापरता येणारा), जार गिफ्ट सेट (स्वतंत्र झाकण्याच्या बरण्या वा जार), सजावटीची टोपली (आवडीनुसार अनेक प्रकार ठेवता येतात) --- कोट दुष्काळामुळे यंदा कसा प्रतिसाद मिळेल ते येणाऱ्या काळात कळेल. गेल्या वर्षी दिवाळीत पाच हजारपेक्षा अधिक भेटवस्तूंची विक्री झाली होती. -मोदाराम चौधरी, सागर स्वीटस -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

Latur District Bank: ‘जिल्हा बँक सहकारी राहिली नाही, देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली’; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT