नाशिक

कथक, भरतनाट्यम, लोकनृत्याचा थाट

CD
फोटो : H34804 कथक, भरतनाट्यम, लोकनृत्याचा थाट अभिजात अकादमीची रंगली अनोखी दिवाळी पहाट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : शहरापासून काहीशा दूर अंतरावर गावाकडील निसर्गरम्य वातावरणात कथक, भरतनाट्यम तसेच लोकनृत्याचा अनोखा अनुभव उपस्थित रसिकांना लाभला. निमित्त होते, अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी संस्था आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. उपक्रमाचे तिसरे वर्ष होते. गंगापूर धरणाजवळील अभिजात अकादमी (गुरूकुल) स्टुडिओत शनिवार (ता. ७) पहाटेच्या प्रसन्न प्रहरी एकीकडे दिवस उजाडत असताना, गावाकडच्या गुलाबी थंडीत लोकनृत्य, कथक नृत्य व भरतनाट्यमच्या ‘नृत्यगंगा’ संयुक्त सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भरतनाट्यम नृत्यांगना शिल्पा देशमुख व त्यांच्या विद्यार्थिनींनी ‘नृत्यगंगा’ शैलीतील नृत्याविष्कार सादर केला. अभिजात अकादमीच्या विद्यार्थिनी व गुरू विद्या देशपांडे यांच्या कथक नृत्यातील अभिनय व लयकारीला रसिकांनी भरभरून दाद दिली. महंत महेशदास वैष्णव महाराज, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सरपंच लक्ष्मण बेडकुळे, नितीन पवार, रमेश बापट, शिल्पा देशमुख, विद्या व सुनील देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची सुरवात विविध नृत्यशैलीतील दीपनृत्याने झाली. भरतनाट्यम शैलीतील ‘तांडव नृत्य करी’ गणेश वंदनापाठोपाठ आदर्श शाळेच्या विद्यार्थिनींनी अंबाबाईचा गोंधळ व सरस्वती वंदनाने देवतांची आराधना केली. ‘नृत्यगंगा’ भरतनाट्यमच्या भगिनी शैलीत तराणा व गदिमांचे ‘घट लोण्याचे’ यावरील अभिनय पद सादर करण्यात आले. गंगावऱ्हेच्या व सावरगावच्या विद्यार्थिनींनी ‘तारपा नृत्य’ व तिरंगा फडकवत लोक नृत्य सादर केले. अभिजातच्या विद्यार्थ्यांनी पंडिता रोहिणी भाटे यांचा ‘त्रिवट’ पं. बिरजू महाराज यांचा ‘धमार चतरंग’ सादर केला. नृत्यगुरू विद्या देशपांडे यांनी बिंदादीन महारांचे ‘ऐसे राम’ पद सादर केले. समारोप शुभा मुदगल यांनी गायलेल्या भैरवीने झाली. अदिती गोरे यांनी निवेदन केले. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire Alert: पुणेकरांचा निष्काळजीपणा भोवला; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या घटनांचा उच्चांक! ९४ ठिकाणी अग्नितांडव

मला कळत होतं हा जेलस आहे... आमिर खानच्या छोट्या भावाबद्दल वर्षा उसगावकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या-तावातावत बोलून...

दिवाळीच्या रात्री नागपुरात रक्तरंजित थरार! फटाके फोडण्यावरून वाद, चार जणांनी तरुणाला संपवलं

Viral Video : चेकिंगदरम्यान पोलिसाने इन्फ्लुएंसरकडे मागितले दिवाळी गिफ्ट, VIDEO VIRAL; लोक म्हणाले- ही तर खुलेआम लूट

Maharashtra Live News: चिखलीतील आरंभ हॉटेल परिसरात झाडी-झुडपात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

SCROLL FOR NEXT