नाशिक

शास्त्रीय- सुगम संगीताच्या संगमाने रंगली दिवाळी पहाट

CD
मेनफिचर शहर टुडे तीन चारसाठी ------------ (सूचना : गर्दी असल्याने फोटो मोठा वापरावा) NSK26H34745 जळगाव : परिवर्तनतर्फे रविवारी भाऊंच्या उद्यानात आयोजित ‘दिवाळी पहाट’च्या सुरेल मैफिलीत गीत सादर करताना कलावंत. समोर उपस्थित रसिकांसह खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदी. ----- शास्त्रीय-सुगम संगीताच्या संगमाने रंगली ‘दिवाळी पहाट’ ---- रसिकांची दाद; ‘परिवर्तन’च्या कार्यक्रमात संतवाणी, गझल, सुफी, लावण्यांची मेजवानी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : शास्त्रीय संगीताचा गोडवा, चित्रपटगीतांची लोकप्रियता, संतवाणीचा भक्तिरस व सुफी संगीताची अनुभूती अशा विविध सुरेल रंगांची उधळण करीत परिवर्तन संस्थेतर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम रविवारी (ता.८) येथील भाऊंच्या उद्यानात उत्साहात झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत सुसूंद्री व फुलबाजा पेटवून या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डॉ. सोनाली महाजन, डॉ. राहुल महाजन, अमर कुकरेजा, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, अनिल कांकरिया यांची यावेळी उपस्थिती होती. खासदार वाघ यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आगामी दुष्काळी संकटाचा विचार करून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. आमदार भोळे यांनी ‘अंत्योदयाची दिवाळी’ या संकल्पनेचे महत्त्व विशद केले. १४-१ संतवाणीने मैफील सुरू संत एकनाथ महाराज यांची ‘संत भार पंढरीत’ ही रचना वैष्णवी केऱ्हाळे हिने सादर करून संगीत मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर संत मीराबाई यांची ‘एक राधा, एक मीरा’ ही रचना चारुल पाटील यांनी सादर केली. गोपाल ठाकरे, वैष्णवी व चारूल पाटील यांनी लाल इश्क व यमन रागाचा सुरेल संगम साधत ‘मेरा इश्क, तेरा इश्क, ये लाल इश्क’ हे गीत सादर केले. भैरवीने सुरेल सांगता ‘दमादम मस्त कलंदर’ या सुफी रचनेने मैफलीत वेगळाच रंग भरला. ‘काहे छेड मोहे’, ‘झुकी झुकी सी नजर’ या गझलेनंतर चारूल पाटील हिने सादर केलेल्या ‘तुझ्या उसाला लागलं कोल्हा’ या लावणीला रसिकांची भरभरून दाद मिळाली. चारूल व वैष्णवी यांनी ‘मोहे रंग दो लाल’ सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी वन्स मोअरची मागणी केली. ‘हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही’ या भजनाने भक्तिरसाची अनुभूती दिली. पुणे येथील डॉ. कुंदन इंगळे यांनी ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे लोकप्रिय गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘आगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली. यांची संकल्पना अन् संगीतसाथ ‘शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटगीते’ ही भूषण गुरव यांची संकल्पना या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. करण नाले या सात वर्षांच्या शिष्याने व त्याचे गुरु शिवम चक्रवर्ती यांनी सिंथेसायझरवर संगीतसाथ दिली. दर्शन गुजराथी यांनी ऑक्टोपॅड, तर राजेंद्र माने यांनी हार्मोनियमची साथ केली. हर्षल पाटील यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रम उंचीवर गेला. निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर व विनोद पाटील यांची होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

Samruddhi Magdum Death : लेकीच्या जन्माचा आनंद क्षणात विरला! आठ महिन्यांच्या गर्भवतीचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्रावामुळे दुर्दैवी मृत्यू, मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Rising Star Asia Cup: रिंकू सिंग भारतीय संघाचा उपकर्णधार! पाटीदारची अचानक माघार, सध्या निवड न करण्याची BCCI कडे विनंती

Ganga returns to Haridwar Har Ki Pauri : १८ दिवसांनंतर अखेर 'तिचे' पुनरागमन! ऐन दिवाळीच्या दिवशी वाहू लागला खळाळता प्रवाह; घाटांवर भाविकांचा महापूर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये खळबळ! खोकलाई चौकातून घरी निघालेली २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा संशय

SCROLL FOR NEXT