टुडे पान ४ ॲंकर
----
लोगो : वेध दीपोत्सवाचे...
----
NSK26H33649 : जळगाव : बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेले मातीचे झुंबर
NSK26H33650 : आकर्षक रंगीत पणत्या.
----
रंगीबेरंगी दिवे, मातीचे झुंबर ठरताहेत लक्षवेधी
बाजारपेठ सजली; पारंपरिक, आधुनिक सजावटीच्या साहित्याने फुलली दुकाने
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२७ : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांत रोषणाई, सजावटीच्या तयारीला सुरुवात झाली असून, बाजारपेठेत रंगीबेरंगी आकर्षक दिवे, एलईडी लाइट्स, आकाशकंदील आणि पारंपरिक मातीच्या झुंबरांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. आधुनिक विद्युत रोषणाईसोबतच पारंपरिक सजावटीच्या साहित्याचीही मागणी कायम असल्याने बाजारपेठेत विविधतेचे चित्र पाहायला मिळत आहे.
दिवाळीत घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळून निघावा, यासाठी नागरिक विविध प्रकारच्या दिव्यांची खरेदी करत आहेत. घराच्या प्रवेशद्वारापासून ते बाल्कनी, खिडक्या आणि अंगणापर्यंत सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रोषणाईचा वापर केला जात आहे. यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील सजावटीच्या साहित्याची दुकाने ग्राहकांनी गजबजली आहेत.
दिव्यांचे आकर्षण
आधुनिक दिव्यांची चमक वाढली असली, तरी पारंपरिक मातीच्या दिव्यांचे महत्त्व कायम आहे. यंदा मातीच्या झुंबरांसह विविध आकारांतील पणत्या, सजावटीचे दिवे आणि कलात्मक मातीच्या वस्तूंनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची आवड असलेल्या नागरिकांकडून अशा वस्तूंची खरेदी केली जात आहे.
४० रुपयांपासून सुरुवात
बाजारात विक्रीसाठी आलेल्या आकर्षक रंगीत पणत्या ४० रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर विविध प्रकारचे आकर्षक झुंबर हे ८० रुपयांपासुन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घराची शोभा वाढविणाऱ्या या मातीच्या वस्तूंना पसंती दिली जात आहे. दिवाळीच्या सजावटीमध्ये यंदा पारंपरिक आणि आधुनिक वस्तूंचा संगम पाहायला मिळत आहे.
कोट
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून दिव्यांचे दुकान थाटले आहे. विक्रीसाठी विविध प्रकारचे रंगीबेरंगी दिवे आणि सजावटीचे साहित्य उपलब्ध केले आहे. मात्र, अद्याप ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्यांच्या हातात पैसा कमी असल्याने खरेदीवर त्याचा परिणाम जाणवत आहे.
- जिजाबाई कोल्हटकर, विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.