नाशिक

दिवाळीत रात्री दिवाळीत रात्री ११

CD
ॲंकर (मजकूर जागेप्रमाणे कापता येईल) ---- रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास मनाई दिवाळीत ध्वनी, हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाळीच्या कालावधीत ध्वनी व हवा प्रदूषणामुळे होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी या निर्देशांचे पालन करून दिवाळी सण सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशाासनतर्फे करण्यात आले आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार, पर्यावरण (संरक्षण) नियमांमधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. फटाका उडविण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर करण्यास बंदी आहे. तसेच साखळी फटाक्यांसाठी निर्धारित ध्वनी मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून, नियमांनुसार प्रतिबंधित असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर करता येणार नाही. फटाके वाजविण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजविण्यास मनाई आहे. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालयांच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील शांतता क्षेत्रात कोणत्याही वेळी फटाके वाजविण्यास परवानगी नाही. चौकट ...अन्यथा फटाके होणार जप्त ध्वनी व हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके तसेच नियमबाह्य साखळी फटाके आढळल्यास ते जप्त करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT