NSK26H34543
जळगाव : फराळ वाटपप्रसंगी उपस्थित पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, डॉ. अभिजित पाटील, डॉ. धनंजय बेंद्रे, डॉ. गणेश पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, नारीशक्तीच्या अध्यक्षा मनीषा पाटील आदी.
बेघर आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ
‘नारीशक्ती’, ‘रेड स्वस्तिक’चा उपक्रम; माणुसकीचा उजळला दीप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : दिवाळीनिमित्त समाजातील वंचित, निराधार आणि बेघर ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे बेघर ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
दिवाळी हा आनंद, प्रेम आणि आपुलकीचा सण असून समाजातील प्रत्येक घटकाला या आनंदात सहभागी करून घेणे हीच खरी दिवाळी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गोपाल देशमुख, डॉ. अभिजित पाटील, डॉ. धनंजय बेंद्रे, डॉ. गणेश पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील उपस्थित होत्या.
या उपक्रमासाठी माजी आमदार लता सोनवणे यांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी वंदना मंडावरे नूतन तासखेडकर, किमया पाटील, रेणुका हिंगू, हर्षा गुजराती, तेजल वनरा, स्मिता पाटील, राधिका शर्मा संचालक श्री प्रशांत गायकवाड व्यवस्थापक मनोज कुलकर्णी किशोर पाटील शितल काटे हर्षल वंजारी खंडू शिरसाट उपस्थित होते. प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. शिवराज पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.