Crowd of passengers waiting for bus at Thakkar Bazar bus stand.
Crowd of passengers waiting for bus at Thakkar Bazar bus stand. esakal
नाशिक

Diwali Festival : आली दिवाळी, चला मामाच्या घरी; बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : ‘आली दिवाळी, चला मामाच्या घरी’, अशा प्रकारचे चित्र सध्या बसस्थानकात दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त आपापल्या गावी निघालेल्या प्रवाशांमुळे बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसून येत आहे. खाजगी ट्रॅव्हल्स कार्यालयावरदेखील प्रवासी असल्याचे दिसत आहे. (Diwali Festival bus station overflowing with passengers Nashik Latest Marathi News)

नोकरी, व्यवसाय, शिक्षण यासह विविध कामानिमित्त बहुतांशी नागरिक गाव सोडून शहरात आलेले आहेत. दिवाळीच्या औचित्य साधत असे सर्व नागरिक आपापल्या गावी जाऊन कुटुंबीयांसह दिवाळी साजरी करतात. चिमुकल्यांमध्ये गावी जाण्याचे विशेष आकर्षण असते. पूर्वीपासून दिवाळी सण आला की माहेरवाशीन माहेरी जात असतात. मामाच्या गावी जायचे या विचाराने चिमुकल्यांमध्ये उत्साह असतो.

गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांना गावी जाता आले नाही. चिमुकल्यांनादेखील मामाच्या गावी जाण्यापासून वंचित राहावे लागले. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यास मिळणार आहे. महिला आणि चिमुकल्यांमध्ये उत्साह अधिक दिसून येत आहे. यंदा तरी मामाच्या गावी जाण्यास मिळेल, यामुळे आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे शनिवार (ता. १६) पासून बहुतांशी शाळा महाविद्यालयांना सुटी लागली आहे.

त्यामुळे नागरिक दिवाळीसाठी गावी जाण्यास निघाले आहे. बसस्थानक नागरिकाच्या गर्दीने फुलून निघाले आहे. कधी एकदा आपल्या गावाची बस येते आणि आपण बसमध्ये बसून गावी पोचू या बाबतची कुतूहलता अनेकांमध्ये बघावयास मिळत आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानकावर अशा प्रकारची गर्दी तर आहेच. याशिवाय आरामदायी प्रवास म्हणून काहीजण खाजगी लक्झरी बसने तसेच ट्रॅव्हल्स वाहनांनी गावी जात असल्याने त्यांच्या कार्यालयातही प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

सुखकर प्रवास व्हावा यासाठी काही जणांकडून एसटी महामंडळ असो वा खाजगी बस यांची आगाऊ बुकिंग करून घेतली जात आहे. तर काहींकडून बस स्थानकावर बस येताच खिडकीतून रुमाल किंवा बॅग आत टाकून सीट आरक्षित केले जात आहे. येत्या शनिवार, रविवारी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

एसटीला अधिक पसंती

खाजगी ट्रॅव्हल बसचे गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी अपघात झाले. काही दिवसांपूर्वीच शहरात औरंगाबाद रोडवर खाजगी ट्रॅव्हल बसचा मोठा अपघात होवून बारा जणांना प्राणास मुकावे लागले. यामुळे अनेकांनी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे पसंत केले आहे. त्यामुळे बस स्थानकावर अधिक गर्दी दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

SCROLL FOR NEXT