नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : आशादायक : आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर उमलले हसू; नीरा फाउंडेशनकडून कातकरी वस्त्यांवर दिवाळी फराळ वाटप : फराळ वाटप करत केली अनोखी दिवाळी साजरी :

CD
पान-२ अँकर फोटो : 08912, 08913 तारीचामोढा (ता. इगतपुरी) : येथील आदिम कातकरी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करताना सुहास शिंदे, विक्रम पवार, मंगेश पाळदे, संदीप मेढे, राम शिंदे, आबाजी बारे आदी. आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर उमलले हसू नीरा फाउंडेशनकडून कातकरी वस्त्यांवर दिवाळी फराळवाटप -------------------------------- सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. ६ : दीपोत्सवाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः वंचित आणि दुर्गम भागातील बांधवांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देवळाली कॅम्प येथील नीरा फाउंडेशनतर्फे तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्गम, आदिवासी, कातकरी वस्त्यांवर जाऊन संस्थेतर्फे ग्रामस्थांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. नीरा फाउंडेशनतर्फे टाकेद बुद्रुक, अधरवड, तारीचामोढा, परदेशवाडी, टाकेद खुर्द, उंटवाडी, धामणगाव आदी गावांतील आदिवासी कातकरी वस्त्या, वाड्यांमध्ये दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. सुमारे एक हजार कुटुंबांना हे वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील कातकरी कुटुंबांना गरिबी आणि रोजगाराच्या अभावामुळे दिवाळीचा आनंद घेता येत नाही. तसेच यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे परिस्थिती आणकी हलाखीची झाल्याने नीरा फाउंडेशनतर्फे दिवाळी फराळाचे वाटप झाले. सण-उत्सव हे सर्वांसाठी असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सणाचा आनंद पोहोचवणे हेच आमचे मुख्य कर्तव्य आहे. या बांधवांच्या चेहऱ्यावरील हसू हीच आमच्यासाठी दिवाळीची खरी भेट आहे, अशी भावना नीरा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुहास शिंदे यांनी व्यक्त केली. उपक्रमात फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुहास शिंदे, राम शिंदे, विक्रम पवार, मंगेश पाळदे, संदीप मेढे, रोशन गावंडे, स्वप्नील गवळी, किरण धोंगडे, रोशन गवळी, गणेश निसाळ, हृषीकेश निसाळ, आकाश गावंडे, ज्येष्ठ नागरिक आबाजी बारे, निवृत्ती ठोके, नवनाथ निर्मळ, गणेश वाजे, पांडुरंग गाढवे आदी सहभागी झाले होते. फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. राम शिंदे यांनी आभार मानले. -----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Latest Marathi News Update : गडचिरोलीत माओवाद्यांचा कट उधळला; जंगलात जमिनीखाली लपवला होता स्फोटकांचा साठा

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

SCROLL FOR NEXT