ॲंकर
(फोटोची तीन कॉलम जागा सोडावी)
जळगाव : बाजारात विक्रीसाठी आलेले विविध प्रकारातील फटाके.
---
फटाक्यांच्या वाढत्या किमतीने खिशाला झळ
यंदा २० टक्क्यांनी वाढ; फॅन्सी, रंगबिरंगी आतषबाजीच्या फटाक्यांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : दिवाळीचा सण म्हटला की रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. मात्र, यंदा फटाके खरेदी करताना नागरिकांना वाढलेल्या किमतींचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत फटाक्यांच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. असे असले तरी दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांकडून फटाके खरेदीला पसंती दिली जात आहे. पारंपरिक फटाक्यांसोबतच विविध आकारांतील फॅन्सी फटाके, आकर्षक रंगांची आतषबाजी करणारे फटाके आणि नवीन प्रकारच्या फटाक्यांकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाक्यांच्या दुकानांमध्ये विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. लहान मुलांसाठी कमी आवाजाचे आणि आकर्षक रंगांची रोषणाई करणारे फटाके, तरुणांसाठी फॅन्सी फटाके तसेच कुटुंबासह दिवाळी साजरी करण्यासाठी विविध प्रकारच्या फटाक्यांची खरेदी केली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांची मांडणी केली आहे.
यंदा फटाक्यांच्या किमती वाढल्याने खरेदीचे नियोजन करताना नागरिकांकडून बजेटचा विचार केला जात आहे. करण्यावर भर दिला जात आहे.
फॅन्सी फटाक्यांचे आकर्षण
पारंपरिक फटाक्यांसोबतच यंदा फॅन्सी फटाक्यांना विशेष पसंती मिळत आहे. आकाशात विविध रंगांची रोषणाई करणारे फटाके, आकर्षक दृश्य निर्माण करणारे फटाके आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आतषबाजीच्या संचांकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे. विशेषतः लहान मुलांसाठी फटाके खरेदी करताना पालकांकडून आकर्षक दिसणाऱ्या प्रकारांना प्राधान्य दिले जात आहे.
चौकट
फटाक्यांच्या ‘गिफ्ट बॉक्स’ला पसंती
यंदा दिवाळीत फटाक्यांच्या गिफ्ट बॉक्सला ग्राहकांकडून चांगली मागणी होत आहे. विविध प्रकारचे आणि आकर्षक फटाके एकाच बॉक्समध्ये उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा या पर्यायाकडे कल वाढला आहे. बाजारात ४००, ८००, १२०० आणि २ हजार रुपयांपर्यंतच्या किमतीचे गिफ्ट बॉक्स उपलब्ध आहेत.
कोट
यंदा फटाक्यांच्या किमतीत साधारण दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक खरेदी करताना आधीच्या तुलनेत बजेटचा विचार करत आहेत. मात्र, यंदा फटाक्यांच्या गिफ्ट बॉक्सला चांगली मागणी आहे.
- युसूफ मकरा, फटाके विक्रेता