नाशिक

दोनशे वंचित कुटुंबांच्या घरात माणुसकीचा दिवा

CD
लोगो : प्रेरणादायी ------ दोनशे वंचित कुटुंबांच्या घरात माणुसकीचा दिवा ------- निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचा ''एक फराळ गरजूंसाठी'' उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : येथील निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या ''एक फराळ गरजूंसाठी'' या सामाजिक उपक्रमांतर्गत यंदा बडवानी तांडा,''पानशेवरी, बढाई व चांदण्या तलाव गाववस्ती परिसरातील दोनशे गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानने २०१७मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षांपासून कोणताही खंड न पडता हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या सेवाकार्यासाठी हाऊस ऑफ ज्वेलर्स बाय बाफना यांचे संचालक सुनील बाफना, शिल्पा मल्हारा व एल. एच. पाटील स्कूल परिवार, अविनाश काकाजी शिलेहार यांच्या स्मरणार्थ नवीन चौकसे व शिल्पा चौकसे, ठाणे जिल्ह्यातील सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, माँ तारा फूडचे संचालक योगेश तलरेजा, सिद्धेश दहाड, डॉ. कोमल पाटील, तृप्ती दोषी, हर्षदा पाटील, वंदना थोरात यांनी मोलाचे आर्थिक व सामाजिक सहकार्य केले. विशेषतः लंडन येथून या सेवाकार्यासाठी सहकार्य करणारे नवीन चौकसे यांचे प्रतिष्ठानच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले. विविध क्षेत्रांतील दानशूर व्यक्ती व संस्थांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीमुळेच दोनशे कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविणे शक्य झाले. ११४-१ यांचा होता सहभाग या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे धीरज जावळे, पूनम भाटिया, धनंजय सोनवणे, सुलतान पटेल, शारदा सोनवणे, नीलेश राजपूत, किरण महाजन, देवीदास महाजन, वेदांत ताडे, दिशा ताडे, अनन्या अल करी, भय्या पाटील, हर्षल महाजन, प्रणव धनगर, शिवाज्ञा जावळे, संस्थेचे संस्थापक अविनाश जावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

Nagpur Earthquake Latest Update : नागपूर जिल्ह्यात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप! तुमच्या भागात जाणवले का धक्के? किती झाले नुकसान?

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

U19 Asia Cup: IND vs PAK सामन्यात ड्रामा! नॉ-बॉलवर भारतीय फलंदाजाला आऊट दिलं? यशवर्धनच्या विकेटवरून वाद

SCROLL FOR NEXT