नाशिक

सलग सुट्यांमुळे शासकीय कामकाज ठप्प

CD
दिवाळीच्या सुट्यांनी सरकारी कामकाजाला ‘ब्रेक’ --- अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सलग रजांमुळे शासकीय कार्यालये ओस सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : दिवाळीच्या सलग सुट्यांचा परिणाम शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर झाला असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) आणि शुक्रवारी (ता. १३) अशा दोन दिवसांसाठीही रजा घेतल्याने कार्यालयांमधील उपस्थिती नगण्य राहील. त्यामुळे या आठवड्यात कार्यालये सुरू असली, तरी प्रत्यक्ष कामकाजाला अपेक्षित गती मिळण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, नागरिकांना आपल्या शासकीय कामांसाठी आता थेट सोमवार (ता. १६)पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचला असून, यंदा सलग सुट्यांची संधी मिळाल्याने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. बुधवार (ता. ११)पर्यंत दिवाळीच्या अधिकृत सुट्या आहेत. त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी कार्यालये सुरू राहणार असली, तरी अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या दोन दिवसांसाठीही रजा घेतली आहे. काहींनी कुटुंबासह मूळ गाव गाठण्यास प्राधान्य दिले; तर काहींनी पर्यटनाचे नियोजन केले. त्यामुळे चालू आठवड्यात दोन दिवस शासकीय कार्यालये सुरू असली, तरी कामकाजासाठी आवश्यक असलेली अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम विविध विभागांतील फाईलींच्या हालचाली, प्रस्तावांची छाननी आणि मंजुरी प्रक्रियेवर होईल. आधीच सुट्यांमुळे रखडलेली कामे आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सलग सुट्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे. दिवाळी सुट्यांचा प्रभाव ओसरल्यावर सोमवारपासून शासकीय कार्यालयांमध्ये नियमित कामकाज सुरू होईल. त्या वेळी प्रलंबित फाईलींचा निपटारा करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. नागरिकांची कामांसाठी पुन्हा धावपळ दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे शनिवार (ता. ७)पासूनच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कामकाज मंदावले आहे. सोमवारपासून कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर प्रलंबित कामांचा मोठा भार अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर असेल. विविध विभागांमध्ये फाईलींचे ढीग साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागतील का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे मंजुरी, दाखले आणि अन्य शासकीय कामांसाठी नागरिकांना पुन्हा कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT