नाशिक

दिव्यांच्या रोषणाईसोबत माणुसकीचा दीप उजळणार

CD
दिवाळी विशेष पुरवणीसाठी लेख --- (संबंधित संग्रहित छायाचित्र किंवा स्केच वापरावे) --- शीर्षक दिव्यांच्या रोषणाईसोबत उजळणार माणुसकीचा दीप लीड... दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, फराळाचा गोडवा, नात्यांमधील स्नेह आणि आनंदाची उधळण... पण या सणाचा खरा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंच्या आयुष्यातही पोहोचविण्याचा प्रयत्न जळगावकरांकडून होत आहे. शहरात एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मैफली रंगणार आहेत, तर दुसरीकडे वंचित मुले, आदिवासी बांधव, शेतकरी आणि गरीब कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना आणि लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवात रोषणाईसोबतच माणुसकीचा प्रकाशही उजळणार आहे. - भूषण श्रीखंडे, जळगाव ---- दिवाळीच्या निमित्ताने जळगाव शहरात सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम आहे. विशेषतः दिवाळी पाडव्याच्या पहाटे होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. चांदोरकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यंदाही महात्मा उद्यानात पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सुरेल संगीताची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. तसेच संस्कार भारतीतर्फे महापालिकेच्या आवारात भक्तिगीतांची मैफल रंगणार आहे. शहरातील विविध भागांत तसेच ज्येष्ठ नागरिक संघात देखील पाडवा पहाटेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवाला सांस्कृतिक सुरांची जोड मिळते. वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अनेक संस्था सामाजिक उपक्रम राबवितात. दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे दीपोत्सव पूजनाचा कार्यक्रम घेतला जातो. नोबेल फाउंडेशनचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांवर जाऊन गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करतात. त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवून सणाचा गोडवा वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. तर भरारी फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना दिवाळी फराळासह बियाण्यांचे वाटप केले जाते. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवत त्यांच्यापर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. लोकप्रतिनिधींकडूनही सामाजिक बांधिलकी जपली जाते. आमदार सुरेश भोळे शहरातील भिल्ल वस्ती आणि गरीब वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मंत्री गिरीश महाजन हे आदिवासी पाड्यांवर जाऊन आदिवासी बांधवांसोबत सणाचा आनंद वाटून घेतात. सामाजिक संस्थांचाही पुढाकार रोटरी क्लब तसेच शहरातील अन्य सामाजिक आणि सेवाभावी क्लबचे सदस्यही दिवाळीनिमित्त विविध उपक्रम राबवितात. गरजू कुटुंबांना फराळ, मिठाई आणि आवश्यक वस्तूंचे वाटप, मुलांसोबत आनंदाचे क्षण, तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे काम केले जाते. विविध सामाजिक संस्था आणि मित्रमंडळांकडूनही अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. चौकट चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविण्याचे प्रयत्न दिवाळीच्या काळात प्रत्येक घरात दिवे लागतात; मात्र एखाद्या गरजू कुटुंबाच्या घरात आनंदाचा दिवा पेटविणे, वंचित मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे आणि शेतकऱ्यांच्या कष्टांना सन्मान देणे, हाच या उत्सवाचा खरा अर्थ आहे. जळगावातील विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपक्रमांतून दिवाळीचा हाच सामाजिक आणि माणुसकीचा संदेश देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं पाहिजे होतं'', आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप

Mumbai News: सरकारला न्यायालयाचा दणका, खासगी प्रकल्पासाठी 'टाटा'च्या जमीन संपादनाचा निर्णय रद्द

कर्नाटकात पेट्रोलमध्ये इथेनॉलची वाढीव मात्रा? सात जिल्ह्यांतील नमुन्यांमध्ये 31.2% पर्यंत प्रमाण; केंद्राकडे कारवाईची मागणी

PM Kisan 25th Installment Date 2027 : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पीएम किसान योजनेचा 25 वा हप्ता कधी मिळणार? 'या' महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद, हाणामारीदरम्यान एका प्रवाशाला ट्रेनमधून बाहेर फेकल्याची घटना

SCROLL FOR NEXT