नाशिक

उत्‍पन्न बुडाल्‍याने व्‍यावसायिकांमध्ये नाराजी

CD
B61164 ----------- उत्‍पन्न बुडाल्‍याने व्‍यावसायिकांमध्ये नाराजी ऐन दिवाळीत मुख्य बाजारपेठेतील दुकाने ठेवली बंद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : सिंहस्‍थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे स्‍थानिक बाजारपेठ सक्‍तीने बंद ठेवली गेली. ऐन दिवाळीच्‍या तोंडावर रविवार कारंजा, मेन रोड, दहीपूलाची दुकाने यंत्रणेकडून बंद ठेवली गेल्‍याने उत्‍पन्नावर पाणी फेरले गेल्‍याने व्‍यावसायिकांनी नाराजी व्‍यक्‍त केली. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी रामतीर्थाकडे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्‍त्‍यांवर पोलिसांनी बॅरेकेटिंग केले होते. यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्‍या मेनरोडचा काही भाग, रविवार कारंजा, रविवार पेठ, सराफ बाजार, भांडी बाजार, धुमाळ पॉइंट येथील बहुतांश दुकाने बंद होती. अनेक ठिकाणी दुकानदारांना पोलिसांनी आतच न सोडल्‍याने ते दुकानांपर्यंत पोचू शकले नाही. पुढील आठवड्यापासून दिवाळीच्‍या सणाला सुरुवात होत असून, शनिवारी-रविवारी कामगार वर्गाची खरेदीसाठी गर्दी होईल, असा व्‍यावसायिकांचा अंदाज होता. परंतु दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्‍याने मोठे उत्‍पन्न बुडाल्‍याची खंत व्‍यावसायिकांनी मांडली. सायंकाळनंतर बाजारपेठेतील काही दुकाने खुली झाली होती. परंतु वाहतुकीच्‍या निर्बंधांमुळे ग्राहक बाजारपेठेपर्यंत पोचू शकले नव्‍हते. -----चौट आता हीच स्‍थिती कायम ठेवा.. एरवी शहरातील रस्त्यांवरून जातांना अतिक्रमीत हातगाड्या, अनधिकृतरीत्या रस्‍त्‍यावर उभ्या केलेल्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा सामना शहरवासीयांना करावा लागतो. मान्‍यवरांच्‍या दौऱ्यानिमित्त रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेले अतिक्रमण काढले. तसेच अनधिकृत वाहनतळांना चाप बसविण्यात आला. हीच स्‍थिती यापुढेही कायम ठेवत, नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यानिमित्त व्‍यक्‍त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

Rohit Sharma 45 story: हिटमॅनच्या जर्सीवर '४५' नंबर कसा आला? आधी द्रविडचा अडथळा अन् मग आईचा सल्ला आला कामी

Teacher Recruitment : मुलाखतीसह शिक्षक भरतीच्या १० हजार ३२८ जागांवर ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस

Know Your Army Exhibition : शस्त्रास्त्रांसह युद्धकौशल्याचे दर्शन; मुंबईकरांना अनुभवता आले लष्करी सामर्थ्य!

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

SCROLL FOR NEXT