नाशिक

शहरभर संगीत मैफल रंगणार

CD
एन्कर फोटो : H34494, H34491, H34462, H34497 -- दिवाळीनिमित्त नाशिककरांना श्रवणीय संगीताची मेजवानी सुरांचा उत्सव; पाडवा आणि भाऊबीज पहाटेला रंगणार मैफली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : शहराला परंपरागत लाभलेल्या संगीत मैफलींनी दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे. यानिमित्त नाशिककरांना लाभणार श्रवणीय सुरांची मेजवानी लाभणार आहे. आमदार देवयानी फरांदे आयोजित भाऊबीज पहाट कार्यक्रमात यंदा गायिका साधना सरगम व गायक ऋषिकेश रानडे यांच्या सुरेल आवाजाची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. गंगापूर रोड येथील प्रमोद महाजन उद्यानात बुधवारी (ता. ११) पहाटे पाचला मैफल होईल. ----- कलापिनी कोमकली यांची स्वरमैफल ‘संस्कृती नाशिक’च्या पाडवा पहाट कार्यक्रमात यंदा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांची स्वरमैफल मंगळवारी (ता. १०) पहाटे पाचला नेहरू चौकातील ऐतिहासिक पिंपळपारावर रंगणार आहे. २८ वर्षांची परंपरा असलेल्या मैफलीचे आयोजन नगरसेवक शाहू खैरे यांचे असून ‘संस्कृती गौरव’ पुरस्कार यंदा गुरुशिष्य जोडी ज्येष्ठ विधिज्ञ दौलतराव घुमरे आणि त्यांचे शिष्य ॲड. एम. वाय. काळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ----- गोदाश्रद्धा फाऊंडेशनतर्फे यंदा ‘फोल्क प्रबोधन’ गोदाश्रद्धा फाऊंडेशन प्रस्तुत सांज पाडवा कार्यक्रमात यंदा ‘फोल्क प्रबोधन’ कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रमाचे यंदाचे २६वे वर्ष असून लोकसंगीताचा आस्वाद नाशिककरांना मंगळवारी (ता. १०) गंगापूर रोड येथील केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी सहाला होईल. संयोजन नगरसेवक व पश्चिम प्रभाग समितीचे सभापती सुरेश पाटील यांचे आहे. ------- ‘नसती उठाठेव’तर्फे दीपावली पहाट नसती उठाठेव मित्र परिवार आयोजित सूरमयी दीपावली पहाट शास्त्रीय संगीत मैफलीत मुंबईच्या किराणा व ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका श्रुती मराठे यांचे गायन रविवारी (ता. ८) गंगापूर रोड, आकाशवाणी केंद्राजवळ श्री हनुमान मंदिरात सकाळी साडेपाचला होईल. त्यांना लिलाधर चक्रदेव (संवादिनी), स्वप्निल भिसे (तबला) साथसंगत करतील. ----- सावनी रवींद्र यांच्या गायकीची मेजवानी माजी महापौर सतीश कुलकर्णी व नगरसेविका संध्या कुलकर्णी आयोजित व अमाेल पाळेकर प्रस्तुत दीपावली पाडवा कार्यक्रमात यंदा राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र व रवींद्र खोमणे यांचे गायन होणार आहे. मंगळवारी (ता. १०) डीजीपीनगर १ येथील विघ्नहरण गणेश मंदिर प्रांगणात सकाळी साडेपाचला मैफल होईल. ------------ अभिजात अकादमीची ‘दिवाळी पहाट’ अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी आणि ग्रुप ग्रामपंचायत सावरगाव-गंगावऱ्हे यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा तिसऱ्या वर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम शनिवारी (ता. ७) अभिजात अकादमी (गुरुकुल) स्टुडिओ, गंगावऱ्हे, गंगापूर धरण बॅकवॉटर परिसरात सकाळी सहाला कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात भारतीय नृत्यकलेच्या विविध शैलींचे दर्शन घडणार असून विद्यार्थ्यांच्या पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरण व हिंदुस्थानी संगीतावर शिल्पा देशमुख यांचे भरतनाट्यम अभिजातच्या भक्ती देशपांडे आणि विद्याहरी देशपांडे यांचे कथक सादरीकरण होईल. -------- सूर विश्वास मैफल शनिवारी विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद जलालपूर शाखा आयोजित सूर विश्वास मैफलीचे ६८वे पुष्प शनिवारी (ता. ७) सावरकरनगर येथील विश्वास गार्डनमध्ये सकाळी सातला गुंफले जाणार आहे. या वेळी संवादिनी वादक पं. सुभाष दसककर, सुरश्री दसककर, गौरी अपस्तंभ, ईश्र्वरी कदडी, अश्र्विनी भार्गवे, डॉ. ज्ञानेश्र्वर कासार यांचे शास्त्रीय गायन होणार असून, सुजित काळे तबला साथ करतील. ------- छाजेड उद्यानात अभिजित कोसंबी महेश धोडपकर प्रस्तुत दीपावली सांज कार्यक्रमात गायक अभिजित कोसंबी यांचे सोमवारी (ता. ९) दीपालीनगर येथील छाजेड उद्यानात गायन होईल. आयोजन नगरसेवक यशवंत निकुळे व रूपाली निकुळे यांचे आहे. ---- दवाई गंधर्व मैफल सोमवारी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचा गायनाचा कार्यक्रम ‘दवाई गंधर्व’ संगीत मैफल सोमवारी (ता.९) सकाळी सहाला शालिमार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बाहेरील परिसरात होणार आहे. ------- गामणे मैदानावर दीपावली पहाट बाजीराव फाउंडेशन आयोजित दिपावली निमित्त पाडवा पहाट सुमधुर गीतांचा बहारदार कार्यक्रम मंगळवारी (ता.१०) सकाळी साडेपाचला पाथर्डी फाटा येथील गामणे मैदान होईल. गायक गणेश कड यांच्यासह अर्जुन तांबे, सुरभी गौड गाणी सादर करतील. ------ इच्छापूर्ती गार्डनमध्ये सांज पाडवा इच्छापुर्ती बहुद्देशीय मित्रमंडळ अमोल पाळेकर प्रस्तुत साद स्वरांची सांज पाडवा मैफल मंगळवारी (ता. १०) चेतनानगर, इच्छापूर्ती गार्डन येथे सायंकाळी साडेसहाला होईल. गायिका गौरी गोसावी गाणी सादर करणार असून आयोजन नगरसेविका वैशाली दळवी, उपमहानगर प्रमुख विनोद दळवी यांचे आहे. -------- युनिक ग्रुपतर्फे पाडवा पहाट युनिक ग्रुप आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमात व्ही. के. म्युझिकल प्रस्तुत या सुखांनो या संगीत मैफल मंगळवारी (ता. १०) राजीवनगर, भगवती चौक येथे सकाळी सहाला होईल. गायक विवेक केळकर, गायिका तृप्ती देव आशा भोसले यांची गाणी सादर करणार असून नगरसेवक सतीश सोनवणे यांचे संयोजन आहे. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

आईने माझी ती डायरीचं जाळून टाकली... ख्रिश्चन मुलाशी लग्न करण्याला कीर्ती सुरेशच्या घरच्यांचा होता विरोध; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : गोकुळच्या राजकारणात माजी सरन्यायाधीशांच्याही मताचा उल्लेख

लग्नानंतर ८ वर्षांनी झालेली मुलगी, आईने करिअरही सोडलं; ९ वर्षीय मुलीचा अचानक वर्गातच मृत्यू, VIDEO VIRAL

Pune-Kolhapur Highway Traffic Update : पुण्याहून पाच तासात कोल्हापूर! ट्रॅफिकचं टेन्शन घेऊ नका, हे नवे पर्यायी रस्ते चेक करा

SCROLL FOR NEXT