मेनफिचर
-----------------
लोगो : दिवाळी पण कर्तव्यही महत्वाचे
------------------------------
NSK26H34770
जळगाव : जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दिवाळीच्या दिवशी रुग्णसेवा करताना परिचारिका.
-------------------------------------------------------------------
रुग्णसेवेतच शोधला त्यांनी दीपोत्सवाचा ‘आनंद’
---------
दिवाळीतही कर्तव्याचा ‘दिवा’ तेवत ठेवणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील परिचारिका
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, रोषणाई व कुटुंबीयांसोबत उत्सव साजरा करण्याचा दिवस. मात्र, याच दिवशी जिल्हा रुग्णालय व शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील काही परिचारिका (सिस्टर) आपल्या कुटुंबापासून दूर राहून रुग्णांची सेवा करीत आहेत. येथील जिल्हा रुग्णालय व शाासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या परिचारिका यांच्यासाठीही आजचा दिवाळीचा दिवस काहीसा असाच आहे. घरातील दिवाळीचा उत्साह बाजूला ठेवून त्या रुग्णांच्या सेवेत तत्पर आहेत.
सर्वसामान्य कुटुंबांत दिवाळीची तयारी अनेक दिवस आधीपासून सुरू होते. घराची साफसफाई, फराळाची तयारी, नवीन कपडे व नातेवाइकांच्या भेटीगाठी अशा वातावरणात प्रत्येक जण रमलेला असतो. मात्र, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी आजही नेहमीप्रमाणेच औषधोपचार, तपासण्या व काळजी घेण्याचे काम सुरू आहे. या सर्व प्रक्रियेत परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
रुग्णांच्या वेदना समजून घेणे, वेळेवर औषधे देणे, डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे, रुग्णांना धीर देणे व त्यांच्या नातेवाइकांना आधार देणे, अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. एखाद्या रुग्णाला वेदना होत असताना त्याच्याजवळ थांबणे, घाबरलेल्या रुग्णाला धीर देणे, हीदेखील त्यांच्या सेवेचीच एक बाजू आहे.
आज त्यांच्या घरातही दिवाळीची तयारी असेल. कुटुंबीय सण साजरा करीत असतील. मात्र, या सिस्टरसाठी रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची प्रकृती व त्याची काळजी घेणे हेच आजचे प्राधान्य आहे. घरच्या दिवाळीचा आनंद काही काळ बाजूला ठेवून त्यांनी रुग्णांच्या आयुष्यात आरोग्याची व आशेची पणती तेवत ठेवली आहे. खरं तर दिवाळी केवळ घरात दिवे लावण्याचा सण नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचाही संदेश देणारा सण आहे. जिल्हा रुग्णालयातील या परिचारिका आपल्या सेवेतून हाच संदेश देत आहेत.
---
आम्ही घेतले ईश्वरसेवेचे व्रत
रुग्णांची सेवा हेच ईश्वरसेवेचे व्रत आम्ही घेतले आहे. मग सण असा की काही अगोदर कर्तव्याला प्राधान्य दिले जाते, अशीच प्रतिक्रिया निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत पाटील, पारिचारिका ज्योती आमटे, गायत्री लांघी, समाधान बाविस्कर यांनी व्यक्त केल्या आहेत.
-------
कोट
माझे कुटूंबिय आंबेजोगाइला आहे. पारिचारीकेने रुग्णांची सेवा करायची असे. त्यात सण, उत्सव, पाऊस, उन, थंडी बाजूला ठेवावी लागते. समाज दिवाळी साजरी करतोय, मात्र मी रुग्णाची सेवा करते. रुग्णसेवेची व्रत घेतले आहे. रुग्णासेवा म्हणजेच दिवाळी असे मी मानते. कुटूंबिय दुर असले तरी संवाद आहे.
-मोहिनी फड, पारिचारिका, जिल्हा रुग्णालय, जळगाव.
---------
कोट
दिवाळीचा सण प्रत्येकजण आपल्या कुटूंबीयांसोबत साजरा करतो. मला ड्यूटी असल्याने कुटूंबीयांसोबत दिवाळी साजरी करता आली नाही. मी कर्तव्याला अगोदर प्राधान्य देते. माझ्यामुळे जर रुग्णांचे आजार लवकर बरा होत असेल, तर माझ्या दिवाळीचा आनंद त्यावर तोकडा आहे.
-प्रणिता फड, पारिचरिका, जिल्हा रुग्णालय, जळगाव.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.