12217
मोरदर: आदिवासी पाड्यावर फराळ व साड्या वाटप करून ‘माणुसकीची दिवाळी’ साजरी करताना.
कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे
आदिवासी पाड्यावर ‘माणुसकीची दिवाळी’
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. ६ : ‘एक दिवा त्यांच्याही घरी’ या संवेदनशील संकल्पनेतून मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे मोरदर (ता. मालेगाव) येथील आदिवासी पाड्यावर ‘माणुसकीची दिवाळी २०२६’ हा सामाजिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहणाऱ्या गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून असोसिएशनने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत आदिवासी बांधवांना साड्या, दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचे वाटप केले. या भेटवस्तूंमुळे आदिवासी कुटुंबांच्या दिवाळीच्या आनंदात भर पडली.
या उपक्रमासाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. संदीप ठाकरे, उपाध्यक्ष रोशन अहिरराव, सचिव गौरव मंडाळे, कोषाध्यक्ष अमोल आहिरे, सहसचिव शरद लोखणे आणि प्रसिद्धीप्रमुख आशिष जैन यांनी पुढाकार घेतला. यासाठी प्रशांत जोशी, अभय देशपांडे, सतीश शेलार, ललित अहिरे, रवींद्र धोंडगे यांनी आर्थिक सहकार्य केले. यावेळी सोमनाथ ठाकरे, जगदीश ठाकरे, भाऊराव अहिरे, पंकज सोनवणे, कैलास पवार, सोमा पवार, रमेश माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाप्रति बांधिलकी जपण्याचा संकल्प असोसिएशनतर्फे व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.