नाशिक

दिवाळीसाठी बाजारात रंगीत रांगोळ्यांची रेलचेल

CD
टुडे ४ ॲंकर लोगो : वेध दीपोत्सवाचे...(आज प्रसिद्ध झालेल्या ॲंकरमधून घ्यावा) --- NSK26H33780 जळगाव : बाजारात विक्रीला आलेली रांगोळी. ------------- NSK26H33781 रांगोळी काढण्यासाठी रेडिमेड ठसे ------------ NSK26H33782 ठिपके काढण्यासाठी प्लास्टिकचा पेन. -- दिवाळीसाठी बाजारात रंगीत रांगोळ्यांची रेलचेल रेडिमेड रांगोळ्या, स्टेन्सिल अन् रंगसंगतीला पसंती; ५०० रुपयांपर्यंत विविध पर्याय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२९ : दिवाळीचा सण जवळ आल्याने शहरातील बाजारपेठा सजावटीच्या विविध साहित्याने गजबजू लागल्या आहेत. घराच्या अंगणात, उंबरठ्यावर आणि देवघरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यासाठी महिलांकडून रंगीत रांगोळीचे रंग, रेडिमेड रांगोळ्या, स्टेन्सिल तसेच विविध आकारांतील सजावटीच्या साहित्याला पसंती दिली जात आहे. वेळेची बचत आणि कमी कष्टांत सुंदर रांगोळी साकारता येत असल्याने तयार रांगोळ्यांकडे महिलांचा कल वाढत आहे. बाजारात पारंपरिक ठिपक्यांच्या रांगोळ्यांबरोबरच फुलांच्या नक्षी, कमळ, स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, मोर आणि दीपांच्या आकारातील रांगोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. नोकरी, व्यवसाय आणि घरकाम सांभाळणाऱ्या महिलांसाठी रेडिमेड रांगोळ्या सोयीचा पर्याय ठरत आहेत. स्टेन्सिलच्या मदतीने कमी वेळेत एकसारखी आणि सुबक नक्षी काढता येते. याशिवाय ठिपक्यांच्या नक्षीचे साचे, रंग भरण्यासाठी तयार डिझाइन आणि विविध आकारांतील रांगोळी संचही उपलब्ध आहेत. चौकटीत रांगोळीच्या साहित्याचे दर - साधे रंग......२० ते ५० रुपये प्रति पाकीट - बहुरंगी संच......५० ते १५० रुपये - स्टेन्सिल........३० ते १५० रुपये रेडिमेड रांगोळी....५० ते २५० रुपये मोठ्या आकारातील रांगोळ्या....२०० ते ५०० रुपये विशेष डिझाइनचे संच........१०० ते ५०० रुपये कोट दिवाळी जवळ आली की रांगोळीच्या रंगांसह रेडिमेड रांगोळ्या आणि स्टेन्सिलला मागणी वाढते. यंदा विविध रंगसंगती, फुलांच्या नक्षी, कमळ, लक्ष्मीची पावले आणि आकर्षक डिझाइन ग्राहकांना भुरळ घालत आहेत. कमी वेळेत सुंदर रांगोळी काढता येत असल्याने महिला तयार रांगोळ्यांना पसंती देत आहेत. ग्राहकांच्या बजेटनुसार २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. - आकाश पाटील, रांगोळी साहित्य विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT