नाशिक

दिवाळी तयारी मालिका : रंगबिरंगी रांगोळीच्या रंगाने बाजारपेठ सजली सकाळ वृत्तसेवा

CD
मेन लोगो : तयारी दिवाळीची -- फोटो : A15075 नाशिक : दिवाळीनिमित्त बाजारात दाखल झालेले रांगोळीचे छापे खरेदी करताना महिला -- रांगोळी बाजार सज्ज; २८ रंगांसह नवनवीन छापे दरांमध्ये वाढ नाही; बाजारपेठेत लाखोंची उलाढाल; खरेदीसाठी महिलांची लगबग सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. २६ : दिवाळीनिमित्त विविधरंगी रांगोळी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. रांगोळीसोबतच विविध छापे (साचे) खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, दुकानांवर महिला वर्गाची मोठी गर्दी दिसून येत आहे. यंदा रांगोळीच्या दरांमध्ये १० रुपयांनी, तर छाप्यांच्या दरांमध्ये कोणतीही दरवाढ झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सण-उत्सव आणि रांगोळीचे समीकरण अतूट मानले जाते. आनंदाचा कोणताही सण रांगोळीच्या रंगांशिवाय अपुराच वाटतो. सध्या सर्वत्र दीपोत्सवाचे वेध लागले असून, त्या पार्श्वभूमीवर रांगोळीला प्रचंड मागणी वाढली आहे. शहरासह राज्यभरातून आलेल्या महिला रांगोळी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. बाजारात पांढऱ्या रांगोळीला सर्वाधिक मागणी असून, त्याव्यतिरिक्त तब्बल २८ विविध रंगांमधील रांगोळी विक्रीस उपलब्ध झाली आहे. या रांगोळ्या राजस्थान, मुंबई आणि पुणे येथून मागवल्या आहेत. बाजारात शुभ-लाभ, लक्ष्मीची पावले, गाय-वासरू, हत्ती, लक्ष्मी प्रसन्न, कुलस्वामिनी प्रसन्न, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा विविध प्रकारांसह आकर्षक नक्षीकाम असलेले प्लास्टिक व नायलॉनच्या जाळीचे छापे विक्रीसाठी आले आहेत. संपूर्ण शहराचा विचार केला तर दिवाळीनिमित्त रांगोळी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. या काळात शहरभरात सुमारे शंभर ते दोनशे टन रांगोळीची विक्री होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवापासूनच रांगोळीला मागणी सुरू होते; त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव आणि शेवटी दीपोत्सवात रांगोळीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यातही सर्वाधिक मागणी दिवाळीतच असते, असे विक्रेत्यांनी नमूद केले. -- अनेकांना मिळाला रोजगार दिवाळीत होलसेल रांगोळी विक्रेत्यांकडे मागणी जास्त असल्याने अनेक बेरोजगार तरुण आणि महिलांना कामाची संधी उपलब्ध होते. याशिवाय काही जण होलसेल व्यावसायिकांकडून रांगोळी खरेदी करून रस्ते व हातगाड्यांवर विक्रीचा व्यवसाय करतात आणि त्यातून आपला उदरनिर्वाह चालवतात. यंदाही अशा प्रकारे अनेक नागरिकांना रोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. बदलत्या काळासोबत आधुनिकतेची छाप रांगोळीवरही दिसून येत आहे. पूर्वी महिला हाताच्या बोटांनी आकर्षक रांगोळ्या साकारत असत. मात्र, आता रांगोळी पेन, बुदली आणि डबी यांचा वापर करून रांगोळी काढण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बाजारात लहान-मोठ्या आकारांतील पेन, बुदल्या आणि डब्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ---कोट पंधरा दिवसांपासून विविध प्रकारच्या रांगोळी प्रचंड मागणी वाढली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम रांगोळीच्या दरावर झाला आहे. - सुरेश सारमर, रांगोळी विक्रेता ........... असे आहेत दर रांगोळी पांढरी..................२० किलो रंगीत रांगोळी...................३० किलो रांगोळी पेन.....................१५ ते ५० रुपये अक्षर लेखन टूल्स.................२०० किट रांगोळी डबी, बुदली...............१० ते ५० छापे..........................१० ते २०० ॲक्रीलिक छापे...................२५ ते ३०० लाकडी छापे......................१० ते ३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit Fake customer care fraud : फुटलेल्या दह्याचे पैसे परत मागणे पडले महागात! व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून 'GPay' उघडताच अवघ्या ६० सेकंदांत बँक खाते रिकामे

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Pune News : दुष्काळात ज्वारीच्या बियाण्यांचे पाठबळ! पावसावर लागवडीचे क्षेत्र ठरणार; शेतकऱ्यांना मिनीकिटचे वाटप

Pune Crime : बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड; पाच लाख ६४ हजारांच्या नोटा जप्त

SCROLL FOR NEXT