धुळे : टुडे पान १ साठी...फोटोसह वाढावा काढणे
--
फोटो क्रमांक : 34721, 4727
धुळे : दिवाळीमुळे खरेदीसाठी आग्रा रोडवर उसळलेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात लक्ष्मीपूजनासाठी साहित्य, फळे खरेदी करताना महिला.
(छायाचित्रे : गोरख गर्दे)
--
दिवाळीच्या खरेदीमुळे बाजारपेठेत पसरले चैतन्य
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शहराच्या मुख्य बाजारपेठेत शनिवारी (ता. ७) खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. गुरुवारपासून (ता. ५) सर्वत्र सुट्ट्या लागल्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी नागरिक कुटुंबीयांसह खरेदीसाठी बाहेर पडले. शहरातील मुख्य व्यापारी केंद्र असलेल्या आग्रा रोड आणि फुलवाला चौक परिसरात खरेदीसाठी नागरिकांची सर्वाधिक झुंबड दिसून आली.
बाजारपेठेत नवीन कपडे, गृहसजावटीचे साहित्य, लक्ष्मीमूर्ती, केरसुणी, पूजेचे साहित्य, पारंपरिक फराळ आणि आकाशकंदिलांच्या खरेदीवर नागरिकांनी भर दिला. मातीच्या पणत्या, नक्षीदार दिवे आणि रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी बाजारपेठ उजळून निघाली आहे. यंदा पारंपरिक आणि आधुनिक सजावटीचा संगम पाहायला मिळत आहे.
-
पूजा साहित्याला मागणी
लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असून झेंडूची फुले ५० ते ८० रुपये किलो दराने विकली जात आहेत. याशिवाय लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीमूर्ती, केरसुणी, तसेच विविध पूजेचे साहित्य आणि प्रसादाचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नातेवाईक, मित्र आणि परिचितांना भेट देण्यासाठी आकर्षक मिठाई आणि सुकामेव्याच्या खरेदीला मोठी मागणी आहे. सणाच्या या वातावरणात रस्त्यावरील छोटे व्यावसायिक आणि विक्रेत्यांसाठी ही गर्दी फायदेशीर ठरली आहे. खरेदीच्या या उत्साहामुळे बाजारातील मरगळ दूर होऊन चैतन्य पसरले आहे.
-
सराफ बाजारात उलाढाल
सोने-चांदीचे भाव कमी- अधिक होत असतानाही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सराफ बाजारात खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, नवीन वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये विचारणा आणि बुकिंगसाठी गर्दी झाली असून, यंदा ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) खरेदीला विशेष पसंती दिली आहे.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.