नाशिक

दीपोत्सवात आकाशकंदिलांची रेलचेल मात्र दुष्काळाच्या झळा, वीस टक्के भाववाढीचा फटका

CD
पान तीन ------------------- 12222 मालेगाव शहर: येथील संगमेश्वर भागातील दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आकाशकंदील. सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. ६ : दीपोत्सवाला अवघा एक दिवस उरला असताना मालेगाव शहरातील बाजारपेठा रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी सजल्या आहेत. यंदाच्या दुष्काळाच्या झळा आकाश कंदील व झगमगाट यांना बसतील असे चित्र आहे. शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर आकाश कंदीलची रेलचेल असून २० टक्के भाववाढीचा फटका बसत असल्याचे व्यावसायिक यांनी सांगितले. नाशिक, मुंबईच्या धर्तीवर मालेगावातही विविध आकारांचे आणि कलात्मक नक्षीकाम केलेले कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पारंपरिक कंदिलांसह आधुनिक सजावटीच्या प्रकारांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी घरोघरी सजावटीची तयारी सुरू झाली असून, घराच्या प्रवेशद्वारापासून ते बाल्कनीपर्यंत आकाशकंदील लावण्याची लगबग दिसून येत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानांमध्ये कागदी, कापडी, बांबूपासून तयार केलेले तसेच विविध रंगांच्या विद्युत रोषणाईने सजवलेले आकाशकंदील आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहेत.यंदा पारंपरिक कंदिलांसोबतच आधुनिक रचनेच्या कंदिलांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. तारा, षटकोन, गोलाकार, चौकोनी,आणि मोराच्या आकारातील कंदील बाजारात उपलब्ध आहेत. आकर्षक झालरी, रंगीत कागद, कापडी सजावट आणि नक्षीकाम यामुळे कंदिलांचे सौंदर्य खुलले आहे. काही राष्ट्र पुरुषांसह अलीकडच्या विविध आंदोलनांचे चित्र असलेले आकाशकंदीलही लक्ष वेधून घेत आहेत. आकर्षक व विविधरंगी आकाशकंदील लहान मुलांसह कुटुंबीयांना आकर्षित करीत आहेत. दृष्टीक्षेपात आकाशकंदिल. साधा आकाशकंदील ते १०० रूपये. डिजिटल आकाशकंदील -१२५ ते २०० रूपये. मोठे सजावट आकाशकंदील - ३०० ते ५०० रूपये. एलईडी लाईटचे आकाश कंदील- ४०० ते १००० रूपये. थ्रीडी डिझायनर आकाश कंदील- ५०० ते १५०० ----------- दिवाळी आकाशकंदील सह सर्व साहित्य हे स्थानिक व्यावसायिक यांच्याकडून खरेदी करून त्याला मदत करावी.स्थानिक व्यावसायिक हे उच्च शिक्षण घेऊन विविध व्यवसाय गावात करतात. उधार उसनवारीची वेळ आल्यास तोच मदतीस येतो ही भावना जपावी. - रामचंद्र हिरे, रामराज्य गृप,आघार बुद्रूक ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाड्यांचे इंजिन धोक्यात! पेट्रोलमध्ये मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉलची भेसळ; कर्नाटक सरकारचे तेल कंपन्यांवर गंभीर आरोप

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

SCROLL FOR NEXT