नाशिक

दिवाळी फराळांचा खमंग दरवळ; शहरात केटरर्सची दुकाने सजली

CD
सेकंड मेन NSK26H34159 जळगाव : दिवाळी फराळ बनवून घेताना महिला. ------------ NSK26H34161 दिवाळीसाठी पापडी बनवताना महाराज. --- दिवाळी फराळाचा खमंग दरवळ; चौकाचौकात स्टॉल्स तयार फराळाला पसंती; मजुरी देऊन घरगुती फराळ बनविण्याकडेही कल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : दिवाळीच्या सणानिमित्त शहरात चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, करंजी, लाडू अशा पारंपरिक फराळाच्या पदार्थांचा खमंग दरवळ पसरू लागला आहे. बाजारपेठेत केटरर्स आणि फराळ विक्रेत्यांची दुकाने सजली असून, तयार फराळ खरेदी करण्यासोबतच मजुरी देऊन घरगुती फराळ बनवून घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. घरात स्वतः फराळ तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचवून अधिक प्रमाणात फराळ बनविण्याचा पर्याय अनेक कुटुंबांकडून निवडला जात आहे. फराळ बनविण्यासाठी साधारणतः १२५ रुपये किलो प्रमाणे मजुरी आकारली जात आहे, तर गोड पदार्थ बनविण्यासाठी २०० रुपये प्रमाणे मजुरी घेतली जात आहे. या पर्यायामुळे घरातील साहित्याचा वापर करून आवश्यकतेनुसार फराळ तयार करून घेणे नागरिकांना शक्य होत आहे. कमी श्रमात अधिक फराळ चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, करंजी, लाडू यांसारखे विविध पदार्थ बनविण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे सर्व पदार्थ स्वतः बनविण्याऐवजी काही पदार्थ तयार विकत घेणे, तर काही पदार्थ मजुरी देऊन बनवून घेणे, असा पर्यायही नागरिकांकडून स्वीकारला जात आहे. घरगुती चव आणि आवश्यकतेनुसार पदार्थांचे प्रमाण राखता येत असल्याने या पद्धतीला पसंती मिळत आहे. तयार फराळाचीही मागणी बाजारपेठेतील फराळ विक्रेत्यांकडे तयार पदार्थांसह विविध प्रकारची पॅकेट उपलब्ध आहेत. चवीतील वैविध्य, वेळेची बचत आणि सोयीमुळे तयार फराळ खरेदीलाही मागणी आहे. दिवाळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी फराळ खरेदी आणि बनवून घेण्याच्या कामांना वेग येत आहे. चौकट - तिखट फराळ व इतर पदार्थ : १२५ रुपये प्रमाणे मजुरी - गोड पदार्थ : २०० रुपये प्रमाणे मजुरी - नागरिकांचा कल : कमी श्रमात अधिक फराळ तयार करून घेण्याला पसंती - प्रमुख पदार्थ : चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, करंजी, लाडू कोट दिवाळीच्या काळात घरगुती फराळ बनवून घेण्यासाठी नागरिकांकडून चांगली मागणी होत आहे. नोकरी आणि व्यवसायामुळे अनेकांना घरी फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे नागरिक साहित्य उपलब्ध करून देतात आणि आम्ही मजुरी घेऊन फराळ तयार करून देतो. -जसराज महाराज, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

SIR चं वास्तव! लग्नाला झाली 6 वर्षे अन् मुलं झाली 12, कुठे वडील मुलापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठे; भाजपने मांडल्या धक्कादायक विसंगती

Numerology Personality Prediction : समोर बोलतात खूप गोड, पण डोक्यात चाललेला असतो वेगळाच गेम! 'या' जन्मतारखांचे लोक असतात भलतेच चलाख; ओळखणे अशक्य

Marathi News Live Updates : 'नॅफ्स्कॉब'च्या संचालकपदी ज्येष्ठ तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड; राष्ट्रीय सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा मान उंचावला

SCROLL FOR NEXT