नाशिक

दिवाळीत एसटी धावणार अतिरिक्त फेऱ्यांसह

CD
(एसटीचे चित्र वापरावे) --- दिवाळीत एसटी धावणार अतिरिक्त फेऱ्यांसह --- जळगाव विभागाकडून सुविधा; महिला सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणीला शिथिलता सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने विशेष नियोजन केले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सुरत या प्रमुख मार्गांवर १०० हून अधिक जादा बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी प्राथमिक स्वरूपात २५० जादा फेऱ्यांचे नियोजन केले असून, सुमारे ४० हजार किलोमीटर अतिरिक्त प्रवास बसकडून होणार आहे. दिवाळीत खासगी वाहनांसह एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते. यंदा एसटीच्या हंगामी तिकीट दरवाढीचा निर्णय रद्द केल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जादा बसच्या नियोजनासह उपलब्ध गाड्यांचा अधिकाधिक वापर करण्यावर विभागाने भर दिला आहे. शालेय बसही सेवेत शाळा आणि महाविद्यालयांना ३० ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या लागणार असल्याने जिल्ह्यातील विविध आगारांच्या ७६ शालेय व मानव विकास बस या कालावधीत नियमित सेवेतून तात्पुरत्या स्थगित करण्यात येणार आहेत. या बस विविध लांब पल्ल्यांच्या मार्गांवर प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या काळात अतिरिक्त वाहतुकीची सोय होणार आहे. पुणे-मुंबईसाठी आरक्षण दिवाळीत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी-चिंचवड येथून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी बसचे आगाऊ आरक्षण उपलब्ध करून दिले आहे. दिवाळीनंतर पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही आरक्षणाची सुविधा सुरू राहणार आहे. चौकट एनसीएमसी कार्डला शिथिलता महिला प्रवाशांना तिकीट दरात पूर्वीप्रमाणेच ५० टक्के सवलत लागू राहणार आहे. एनसीएमसी कार्डच्या वापराबाबत महिला प्रवाशांना तूर्त शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, ज्या महिलांची एनसीएमसी कार्ड नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन परिवहन महामंडळाने केले आहे. कोट दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने यंदाही जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेत सेवा देण्याचा विभागाचा प्रयत्न राहणार आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, जळगाव, परिवहन महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

Breast Cancer: स्तनाचा कर्करोग एकच, पण उपचार वेगवेगळे! प्रत्येक महिलेसाठी स्वतंत्र उपचारयोजना का महत्त्वाची?

SCROLL FOR NEXT