नाशिक

दृष्टीहीन १०० बांधवांना दिवाळीनिमित्त किराणा, फराळाचे वाटप

CD
NSK26H34847 जळगाव : दृष्टिहीन बांधवांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्य, मिठाई व फराळाचे वाटप करताना मान्यवर. दृष्टिहीन बांधवांना किराणा, फराळ वाटप जळगावात दृष्टिहीन संघाच्या विभागीय शाखेतर्फे उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : दिवाळीचा आनंद सर्वांना मिळावा, या सामाजिक भावनेतून दृष्टिहीन संघाच्या विभागीय शाखा, नाशिक यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील १०० गरजू दृष्टिहीन बांधवांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्य, मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. मनोरमाबाई जगताप सामाजिक सभागृहात शुक्रवारी (ता. ६) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत एकदिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला दृष्टिहीन संघाचे महासचिव डी. पी. जाधव, उपाध्यक्ष राजू देवरे, विभागीय सचिव दत्तू बोडके, युवा सचिव राहुल पवार, जळगाव जिल्हाध्यक्ष मंगेश शेवाळे, महासचिव हिलाल सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज भांडारकर, मोहित भोळे, उमेश सोनार, विवेक जगताप तसेच भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष विनय बाहेती उपस्थित होते. प्रास्ताविक मंगेश शेवाळे यांनी केले. डी. पी. जाधव, दत्तू बोडके, मोहित भोळे, मनोज भांडारकर, विनय बाहेती व विवेक जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमासाठी उद्योजक आर. सी. बाफना, सागर चोबे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे सहकार्य लाभले. सचिव हिलाल सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. महासचिव दत्तू बोडके यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली. चौकट दृष्टिहीन बांधवांच्या अडचणी सोडविणार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या दहा दृष्टिहीन बांधवांना किराणा साहित्य, मिठाईचे बॉक्स व फराळाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित १०० गरजू बांधवांना दिवाळीसाठी किराणा साहित्य व फराळ देण्यात आला. यावेळी मान्यवरांनी दृष्टीहीन बांधवांच्या अडचणी समजून घेत त्यांना भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shevgaon Paithan Highway Accident: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळाचा घाला; कानिफनाथांच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

Ambad Traffic Jam: दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी; अंबडमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा

Yavatmal News: आदिवासी विकासमंत्री अशोक उईके थेट कोलाम पोड्यावर; गणेशवाडीत आदिम बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Maharashtra Live News: ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेचे आव्हान

Surakumar Yadav: सूर्यकुमार पुन्हा झाला कर्णधार! BCCI च्या T20 स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व

SCROLL FOR NEXT