नाशिक

दिवाळी फराळातून जीपीओ टपाल कार्यालयास वीस दिवसात आठ लाखांचे उत्पन्न

CD
पान तीन मेन ------------------ 15218 नाशिक : फराळाचे पार्सल विदेशात पाठविण्यासाठी त्याची बांधणी करताना टपाल कर्मचारी. दिवाळी फराळातून टपाल कार्यालयास आठ लाखांचे उत्पन्न विदेशात राहणाऱ्या बांधवांनाही घरगुती फराळाचा आस्वाद; पार्सलचा ओघ सुरूच सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक ता.१२: दिवाळी फराळ पार्सलने जीपीओ टपाल कार्यालयास केले लखपती. अवघ्या वीस दिवसात पार्सलमधून सुमारे आठ लाखाचे उत्पन्न कार्यालयास मिळाले. अद्यापही पार्सल करणाऱ्यांचा ओघ सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे टपाल कार्यालयाच्या तिजोरीत लाखांची भर तर पडलीच आहे. शिवाय विदेशात राहणाऱ्या बांधवांनाही घरगुती फराळाचा आस्वाद घेता आला आहे. शिक्षण, नोकरी अशा विविध कारणांनी बहुतांशी शहरवासीय देश विदेशात वास्तव्यास आहे. दिवाळी सारख्या सणाला देखील घरी येणे त्यांना शक्य होत नाही. अशा बांधवांना कुटुंबाचा सहवास लाभावा. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता यावा. यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून टपाल विभागाच्या पार्सल सेवेच्या माध्यमातून दिवाळी फराळाचे पार्सल त्यांच्यापर्यंत पोहोचविले जातात. यंदा देखील शेकडो दिवाळी फराळाचे पार्सल देश-विदेशात टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पोहोच झाले आहे. २३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबपर्यंत जीपीओ टपाल कार्यालयाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशांमध्ये १२९ पार्सल पाठविण्यात आले. त्यातून जीपीओ टपाल कार्यालयास ७ लाख ८९ हजार ३८० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अद्यापही नागरिकांचा फराळाचे पार्सल पाठवण्याचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी देखील चार ग्राहकांकडून फराळाचे पार्सल विदेशात पाठविण्यासाठी बुक केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पोहोच झालेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेणे देश विदेशातील बांधवांना शक्य झाले. ............. जर्मनी, ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वाधिक पार्सल दरवर्षी अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये दिवाळी फराळाचे सर्वाधिक पार्सल पोहच होत असतात. यंदा मात्र अमेरिकेत काही वस्तू पाठविण्यावर असलेल्या बंदीमुळे जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वाधिक पार्सल पाठविण्यात आल्याची माहिती टपाल कार्यालयामार्फत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Pune News : पुणे महापालिका बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता सतेज पाटलांनी फेटाळली; "मला १०० टक्के खात्री आहे, विलीनीकरण होणार नाही"

SCROLL FOR NEXT