प्राथमिक शिक्षकांचे
दिवाळी सुट्टीत प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. ३१ : राज्यातील शिक्षकांना बारा आणि चोवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार यंदा ऐन दिवाळीच्या सुट्टीत प्रशिक्षण असल्यामुळे शिक्षकांच्या सुट्टीच्या आनंदावर विरजण पडले आहे. राज्यभरात एकाच टप्प्यात ऑफलाईन स्वरूपाचे प्रशिक्षण १३ ते २२ नोव्हेंबर याकाळात शिक्षकांना देण्यात येणार आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयांमधील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत मार्गदर्शक सूचना आहेत. प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमुख म्हणून काम पाहणार असून, तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री, तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रशिक्षक व समन्वयक यांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही आहेत.
प्रशिक्षणाच्या प्रत्येक बॅचमध्ये ५० प्रशिक्षणार्थींचा समावेश करण्यात येणार असून, तालुकास्तरावर दहा दिवसांचे प्रशिक्षण नियोजित आहे. तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रति बॅच २० हजार रुपये मूलभूत मानधनासाठी, तर इतर अनुषंगिक खर्चासाठी चार हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.