At Satananaka (Malegaon) women and men sitting by numbers to get snacks prepared by the chef. esakal
नाशिक

Diwali Faral: फराळ तयार करवून घेण्याकडे कल जास्त! प्रति किलोचा दर 100 रुपये किलोप्रमाणे

रवींद्र मोरे

बिजोरसे : फराळ तयार करणे म्हणजे कलाकुसरीचेच काम. पाक व्यवस्थित जमला तर ठिक अन्यथा सारे मुसळ केरात... त्यामुळे कच्चा माल तयार करायचा आणि आचारीकडून दिवाळीचा फराळ तयार करवून घ्यायचा असा आता जणू रिवाजच झाला आहे.

शिवाय शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही महिला अपवादानेच घरी फराळ करतात. त्यामुळे आचारींची चलती असून सध्या प्रतिकिलो शंभर रुपयांप्रमाणे ते फराळ तयार करून देत आहेत. गोड पदार्थांचे दर सव्वाशे ते दीडशे पर्यत आहेत. (Diwali tendency to prepare readymade faral more rate per kg Rs 100 nashik)

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आचारीकडून फराळ बनवण्याची लगबग सध्या सुरू आहे. दिवाळीमुळे घरातील साफसफाईला प्राधान्य असल्याने महिलांकडून तयार फराळाला पसंती दिली जात आहे.

महिलांचे श्रम कमी करण्यासाठी ग्रामीण भागातही आता ठिकठिकाणी आचाऱ्यांनी किराणा दुकानाजवळ मोकळ्या मैदानात गल्लीत छोटेखानी मंडप टाकत दुकान थाटलेली आहेत. कोणताही पदार्थ बनवून देण्यासाठी प्रति किलो शंभर रुपयाच्या पुढे दर आकारले जात आहेत.

दिवाळीत घरी तयार करण्यात येणाऱ्या फराळाची चव विकतच्या पदार्थांना नसली तरी नोकरदार महिलांना वेळेअभावी हे पदार्थ घरी तयार करणे शक्य होत नाही. दिवाळी सुरू आल्याने फराळ तयार करण्यासाठी आणि तयार करून घेण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे.

ग्रामीण व शहरातील भागात फराळाची दुकाने लागली आहेत. अनेक महिला आचा-यांकडून फराळ तयार करून घेत आहेत. सर्व साहित्य घेऊन जावे, मजुरी घेत आचारी आपल्याला हवा तो पदार्थ तयार करून देतो. बहुसंख्य आचारी हे परप्रांतीय आहेत हे विशेष.

बनविण्याची मजुरी किलोनुसार

बारीक शेव ः १००

पापडी ः १००

गाठी शेव ः १००

शंकरपाळे ः १२०

बालुशाही ः १२०

गुलाबजाम ः १५०

खोबरे बर्फी १५०

"राजस्थानी हलवाईंव्यतिरिक्त आधी फराळ कुणीच तयार करत नसे. आता आपले महाराष्ट्रीयन हलवाईही फराळ तयार करू लागले आहेत. रिकाम्या जागेवरच मंडप टाकून फराळ तयार केला जात आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही तयार फराळाला प्राधान्य दिले जात आहे."- राकेश पाटील, एकवीरा केटर्रर्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CID Raid Kolhapur : मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

Pan Card : तुमचा PAN नंबर रँडम नाही! प्रत्येक अक्षरात लपले आहे तुमचं गुपित; जाणून घ्या काय अर्थ आहे

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार श्रेयस तळपदेची एंट्री ? "लोक लक्ष वेधून घेण्यासाठी.."

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची सभा होणार, चार पक्षांनी मागितलेल्या तारखा; अखेर BMCने काढला तोडगा

SCROLL FOR NEXT