नाशिक

आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ, कपडे, शैक्षणिक साहित्य

CD
फोटो: 35123 नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी साजरी करताना संदीपकुमार बोरसे, स्नेहल देव, संदीप देव आदी … आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थांना दिवाळी फराळ, नवीन कपडे वाटप करत नमस्ते फाउंडेशनने आनंदोत्सव साजरा केला. आदिवासी महिलांना साड्या व ब्लाउज पीसचे वाटप करण्यात आले. तसेच महिला-पुरुषांना नवीन कपडे, लहान मुलांना वस्त्रे व शैक्षणिक साहित्य, कुटुंबांना दिवाळी फराळ, मिठाई, आकाशकंदील व पणत्यांचे वाटप करून आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कापडणीस यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासकीय योजनांची माहिती दिली. पेठ तालुक्याचे पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी मार्गदर्शन करत महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा आणि पोलिसांची मदत घेण्याच्या प्रक्रियेविषयी संवाद साधला. फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी हास्ययोगाचे प्रात्यक्षिक घेऊन ग्रामस्थांना तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार आणि आनंदी आरोग्याचा संदेश दिला. खासदार खासदार भास्कर भगरे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. वृंदा लवाटे, सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र महाले, गिरीश गावित,गणेश येवले, दिनेश कोठावदे, आशाताई शिरसाट, अरुणा वाणी, अलका येवले, संदीप देव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan IMD Alert : १५० किमी वेगाने धडकणार महाकाय चक्रीवादळ! अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, 'या' राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट; महाराष्ट्रात काय होणार परिणाम?

Mumbra News: धक्कादायक! मिठाई खाल्ल्यानंतर 5 जणांना त्रास, एकाचा मृत्यू; मुंब्र्यात खळबळ

Foreign YouTuber Viral Video : "सेल्फी नको, मला एक Kiss दे..." प्रसिद्ध पर्यटनस्थळी विदेशी युट्यूबरकडे तरुणाची धक्कादायक मागणी; लाईव्ह स्ट्रीममधील 'तो' व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले!

India US AI Security Pact: AI सुरक्षेसाठी भारत-अमेरिकेसह 10 देश एकत्र; चीनच्या तंत्रज्ञान वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी नवा करार

Latest Marathi News Update : अमित शाहांच्या स्वागतासाठी पुण्यात बॅनरबाजी; भाजपपेक्षा शिंदेसेनेच्या बॅनर्सचीच जास्त चर्चा

SCROLL FOR NEXT