नाशिक

तब्बल ५३ वर्षांनंतर माजी विद्यार्थी भेटले

CD
ॲंकर -------- (गर्दी असल्याने छायाचित्र तीन कॉलम वापरावे) BSW26B12218 भुसावळ : तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र आलेले डी. एल. हिंदी विद्यालयाचे माजी विद्यार्थी. सोबत संस्थेचे कार्याध्यक्ष सत्यनारायण गाेडीयाले, माजी प्राचार्य बी. एस. चाेरडीया, शिक्षक वाय. सी. वारके, ओ. सी. अराेरा आदी. ------------ भुसावळला ५३ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र --- शाळेत भरले स्नेहसंमेलन; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. १६ : येथील डी. एल. हिंदी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. तब्बल ५३ वर्षांनंतर सर्व मित्र एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तत्कालीन शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत विविध क्षेत्रांत कार्यरत व ठिकठिकाणांहून आलेल्या आपल्या माजी विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळा संवाद साधला. शैक्षणिक वर्षे १९७३, १९७४ व १९७५ यांतील बॅचचे माजी विद्यार्थी आता वृद्धत्वाकडे झुकलेले होते. मात्र, त्यांचा मित्रांना भेटण्याचा उत्साह दांडगा होता. मित्रांना भेटण्यासाठी ते पुणे, ईटारसी, अहमदाबाद येथून आले होते. वर्गमित्रांना व शिक्षकांना भेटल्यामुळे शाळेच्या आवारात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गुरूजनांचा सन्मान यावेळी आपल्या गुरूजनांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह देण्यात आले. हिंदी सेवा मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष सत्यनारायण गाेडीयाले या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हाेते. विशेष म्हणजे शाळेचे माजी प्राचार्य बी. एस. चाेरडीया, शिक्षक वाय. सी. वारके, ओ. सी. अराेरा हे वयाची ८० वर्षे पार केलेले गुरुजन उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. योगदानाबद्दल कृतज्ञता काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनाेगतात आपले शालेय जीवनातील अनुभव सांगत शाळेने आपल्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डाॅ. रघुनाथ कश्यप व डाॅ. भुवनेशदत्त गाैर यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यासाठी अनवर खान, सुरेश साहू, कुंजविहारी रावत व राजकुमार कश्यप यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानातील सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरण; न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT