Doctor hiralal Pawar success the first surgery in North Maharashtra Nashik News esakal
नाशिक

डॉ. पवार यांचे यश; उत्तर महाराष्ट्रातील अशी पहिली शस्त्रक्रिया

अरुण मलाणी

नाशिक : रक्‍तवाहिनीत कॅल्‍शियमचे (Calcium) कडक ब्‍लॉक (Block) असताना, हृदयाची शस्‍त्रक्रिया (Heart Surgery) गुंतागुंतीची होती. अशा या परिस्‍थितीत ‘शॉकवेव्‍ह इंट्राव्‍हॅस्‍कूलर बलून लिथोट्रिप्‍सी’ (Shockwave intravascular balloon lithotripsy) या अमेरिकेतील अद्ययावत तंत्राने जोखीमीची शस्‍त्रक्रीया हृदयरोग तज्‍ज्ञ (Cardiologist) डॉ. हिरालाल पवार (Hiralal Pawar) यांनी यशस्‍वी करून दाखविली आहे. सह्याद्री हॉस्‍पिटलमध्ये पार पडलेली अशा स्‍वरूपाची ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली शस्‍त्रक्रिया आहे. या माध्यमातून ६५ वर्षीय महिला रुग्‍णाला जीवदान मिळाले आहे.

डॉ. पवार यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की ६५ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्‍याने त्‍या मुंबईला उपचारार्थ गेल्‍या होत्‍या. तेथे ॲजिओग्राफी झाल्‍यानंतर मुख्य रक्‍तवाहिनीत कॅल्‍शियमचे कडक ब्‍लॉग असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे स्‍टेंट टाकणे अशक्‍य होते. रक्‍तवाहिनीत स्‍टेंट टाकण्यासाठी जी जागा करावी लागते, ती कॅल्‍शियममुळे तयार होत नाही. अशावेळी रक्‍तवाहिनी फाटून मृत्‍यू ओढवू शकतो. अशावेळी रुग्‍णाला बायपास शस्‍त्रक्रीया सुचविली जाते. मुंबईत शस्‍त्रक्रियेसाठी मोठा खर्च सांगण्यात आला होता. अनेक डॉक्‍टरांनी ॲजिओप्‍लास्‍टी शस्‍त्रक्रियेसाठी नकार दिला होता. या रुग्‍णाच्‍या नातेवाइकांनी डॉ. हिरालाल पवार यांच्‍याशी संपर्क साधला. त्‍यांनी शस्‍त्रक्रियेची तयारी दर्शविली. शॉकवेव्‍ह इंट्राव्‍हॅस्‍कूलर बलून लिथोट्रिप्‍सीचा वापर करून जोखीमीची शस्‍त्रक्रिया अवघ्या एक तासात डॉ. पवार यांनी केली.

असे आहे तंत्रज्ञान

डॉ. पवार म्‍हणाले, की शॉकवेव्‍ह इंट्राव्‍हॅस्‍कूलर बलून लिथोट्रिप्‍सी ही अमेरिकन अत्‍याधुनिक उपचार पद्धती आहे. या पद्धतीत बलूनमध्ये असणाऱ्या एमीटरच्‍या माध्यमातून अल्‍ट्रा हाय प्रेशर सॉनिक वेव्‍हस हृदयाला रक्‍तपुरवठा करणाऱ्या धमण्यांतील कठीण अशा कॅल्‍शियमच्‍या ब्‍लॉकला दिल्‍या जातात. त्‍यामुळे कॅल्‍शियम फुटण्यास मदत होते व धमन्‍यांचा आकार मोठा करता येतो. त्‍यामुळे हृदयाला होणारा रक्‍तपुरवठा सुरळीत होतो. यात इतर दुष्परिणामांची शक्‍यता नगण्य असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT