crime fraud news  esakal
नाशिक

Nashik Crime : डॉक्टरला पावणेसहा लाखाला गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्फरन्ससाठी फार्मा कंपनीकडून तुम्हाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगून नाशिक येथील डॉक्टरची पाच लाख ८४ हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (doctor was extorted for six lakhs Nashik Crime Latest Marathi News)

काठे गल्ली येथील डॉ. गिरीश काळे यांना पश्‍चिम बंगाल येथील विशाल पांडे यांनी २२ ते २४ ऑगस्ट २०२२ दरम्यान संपर्क करत तुम्हाला दुबई येथे होत असलेल्या कॉन्फरन्ससाठी ग्लेनमार्क फार्मा कंपनीकडून पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

या मोबदल्यात संशयित विशाल पांडे याने आपल्या बँक खात्यावर डॉक्टरांना पाच लाख ७३ हजार ४५२ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर आपल्या पेटीएम नंबरवरदेखील ८ हजार ४५९ रुपये ऑनलाइन टाकण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. काळे यांनी संबंधित यांच्या खात्यावर पैसे पाठविल्यानंतर काही दिवसांनी त्यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे कळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal News : शिंदे सेनेकडून खासदार देशमुखांच्या स्वागताचे फलक झळकले; खासदार संजय देशमुखांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब

ODI World Cup: 2027 विश्वचषकात रोहित-विराट खेळणार? BCCI ने स्पष्टच सांगितलं, विशेष सवलत मिळणार नाही!

बाबो! राधा पाटीलने घेतली मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल, Viral Video

Mumbai Crime: प्रेयसीसोबत मुंबई फिरायला आला, पण तरुणानं अचानक टोकाचा निर्णय घेतला; इमारतीत गेला अन्... मुंबईत भयंकर घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांच्या गटानेच गद्दारी केली - शिवसेना नेते संजय निरुपम

SCROLL FOR NEXT