stray dogs
stray dogs esakal
नाशिक

Nashik News : निर्बीजीकरण नसल्याने श्‍वान मोकाट; प्रमाणपत्र न तपासता काम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पस्तीस टक्के दरवाढ करून देखील श्‍वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याची वेळ महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागावर आली आहे. निर्बीजीकरणाचे काम देताना ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र बंधनकारक असताना ते न तपासताच काम दिल्याने त्यावर आक्षेप आल्याने ठेका रद्द करण्याची वेळ आली.

यामुळे काम दिल्यापासून सहा महिन्यात झालेले श्‍वान निर्बीजीकरण देखील अडचणीत आले आहे.(Dog lost due to lack of sterilization by animal shelter nashik news)

२००७ पासून महापालिका हद्दीत भटक्या व मोकाट श्‍वानांवर निर्बीजीकरणाची प्रक्रिया केली जाते. मागील पंधरा वर्षात एक लाखांहून अधिक मोकाट श्‍वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली. निर्बीजीकरणासाठी महापालिकेकडे स्वतःची यंत्रणा नाही.

त्यात बंधनकारक करण्यात आल्याने महापालिकेकडून आउटसोर्सिंग केले जाते. भटक्या श्‍वानांना पकडल्यानंतर विल्होळी जकातनाका येथे शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेथून श्‍वान पकडले तेथे पुन्हा सोडावे लागते. तीन वर्षाचा ठेका संपल्यानंतर मे २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया पार पडली.

चार वेळा पुर्ननिविदा प्रक्रिया पार पडली. जून महिन्यात काम देण्यात आले. ज्यावेळी काम दिले गेले त्यावेळी देखील वाद निर्माण झाला. ६५० रूपयांएवजी ३५ टक्के वाढ करून ९९८ रूपये प्रतिश्‍वान दर निश्‍चित करण्यात आला. प्रतिश्वान ३४८ रुपये दरवाढ दिली गेली.

सहा महिन्यात चार हजार ८९६ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले. जुनमध्ये ८१३, जुलै मध्ये ८८४, ऑगस्ट ८७६, सप्टेंबर ७९२, ऑक्टोबर ८५९, नोव्हेंबरमध्ये ६५२ या प्रमाणे श्‍वान निर्बीजीकरण झाले. दरम्यान आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवून काम दिले जाणार आहे.

वर्षनिहाय श्वान निर्बीजीकरण

वर्ष निर्बिजीकरणाची संख्या (हजारात)

२००७-०८ १७४९

२००८-०९ ४४५७

२००९-१० ८३७४

२०१०-११ ९६१६

२०११-१२ १०,१४८

२०१२-१३ २८०१

२०१३-१४ ६७११

२०१४-१५ ६८०३

२०१५-१६ ६३१४

२०१६-१७ ६४६०

२०१७-१८ ८८९७

२०१८-१९ ७८५२

२०२०-२१ ६१८७

२०२१-२२ ७९८८

२०२२-२३ ९२७९

२०२३-२४. ४८९६ (नोव्हेंबर अखेर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT