‘श्वान निर्बीजीकरण’ महिन्यांपासून बंद sakal
नाशिक

नाशिक : ‘श्वान निर्बीजीकरण’ महिन्यांपासून बंद

ठेकेदार कंपनीबाबत तक्रारी आल्‍याने पशुसंवर्धन विभागाकडून कामबंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील भटक्या श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी सुरू असलेल्या निर्बिजीकरण प्रक्रिया एक महिन्यांपासून बंद झाली आहे. ठेकेदार कंपनीबाबत तक्रार आल्याने पशुसंवर्धन विभागाने काम बंद करण्याचा निर्णय घेतला.

२००७ पासून शहरात श्वान निर्बिजीकरणाचे काम दिले जाते. दरवर्षी निविदा काढल्या जातात. मागील वर्षाचे काम पुणे येथील ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेला देण्यात आले. शहरातील भटके श्वान पकडून त्यांच्यावर विल्होळी येथील महापालिकेच्या जुन्या जकात नाका इमारतीमध्ये निर्बीजीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाते. चौदा वर्षात ७८ हजार भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे. या वर्षीच्या ठेक्यामध्ये अकरा महिन्यात सात हजार ९८८ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण कामात भटक्या कुत्र्यांना पकडून शस्त्रक्रिया करणे, तीन दिवसानंतर जेथून श्वान पकडले तेथून पुन्हा त्याच ठिकाणी सोडणे बंधनकारक आहे. दरम्यान, श्वान निर्बीजीकरणाच्या तक्रारी वाढत असल्याचे कारण देत पशुसंवर्धन विभागाने पर्यायी व्यवस्था न करता १७ नोव्हेंबरपासून कामकाज बंद केले आहे. नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येतील व श्वान निर्बिजीकरण पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी दिली.

वर्षनिहाय झालेले श्वान निर्बीजीकरण

वर्ष - निर्बीजीकरण झालेले श्वान

  • २००७-०८ - १,७४९

  • २००८-०९ - ४,४५७

  • २००९-१० - ८,३७४

  • २०१०-११ - ९,६१६

  • २०११-१२ - १०,१४८

  • २०१२-१३ - २,८०१

  • २०१३-१४ - ६,७११

  • २०१४-१५ - ६,८०३

  • २०१५-१६ - ६,३१४

  • २०१६-१७ - ६,४६०

  • २०१७-१८ - ८,८९७

  • २०१८-१९ - ७,८५२

  • २०२०-२१ - ६,१८७

  • २०२१-२२ - ७,९८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT