Gas cylinder tanks, material and two suspects were seized during raids in Kewal Park area. Along with the team of Unit Two of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : केवळ पार्कमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : घरगुती वापराच्या गॅसचा काळाबाजार करून तो अवैधरीत्या खासगी रिक्षा व अन्य वाहनांत भरणाऱ्या दोघांना युनिट दोनच्या पथकाने सातपूर परिसरात छापा टाकून पकडले. (Domestic gas black market in park only Both arrested Nashik Crime News)

महेश रमेश गांगुर्डे (रा. कुणाल रो हाउस, हेडगेवार चौक, सिडको) व नीलेश दिनेश इंगळे (रा. न्यू शिंदे सायकल दुकानाच्या बाजूला, त्रिमूर्ती चौक, सिडको) अशी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या सूचनेनुसार पोलिस पथके अवैध धंद्यांचा शोध घेत असताना, युनिट दोनचे हवालदार राजेंद्र घुमरे यांना केवल पार्क येथे अवैध गॅस भरणा अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाळ, सहायक उपनिरीक्षक यशवंत कोळी, हवालदार राजेंद्र घुमरे, नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, संपत सानप, संजय सानप, अतुल पाटील, सुनील आहेर, प्रशांत वालझाडे, पुरवठा निरीक्षक स्वप्नील थोरात यांनी केवल पार्कमधील सचिन काळे यांच्या पत्राचे शेडसमोरील अड्ड्यावर छापा टाकला.

या छाप्यात गॅस सिलिंडरमधून खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे दोन रिफिलिंग मशिन, भरलेल्या व रिकाम्या अशा २१ गॅस सिलिंडर, दोन वजनकाटे, नीलेश इंगळेच्या खिशात १२०० रुपये रोख, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर असा ९१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरुद्ध सातपूर पोलिसात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा? सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ram Shinde: हरित क्रांतीचा नवा अध्याय : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड

Pune News: राज्यात धरणसाठा ६० टक्क्यांवर; पुणे विभागात मुबलक पाणी, जोरदार पावसाने काही भागांत पूरस्थिती

Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी शासनाची पुढची स्टेप, पालकमंत्री आबिटकरांनी कायदेशीर त्रुटी दूर करण्यावर दिला भर

संतापजनक! आळंदीत वारकरी संस्थेत तरुणीवर बलात्कार, किर्तनकार महिलेसह कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT