नाशिक

जिल्हा क्रिकेट स्पर्धेत यश

CD
NGL26B04123 दोंडाईचा : येथील रोटरी स्कूलच्या क्रिकेट संघाला पारितोषिक देताना मान्यवर. -------- दोंडाईचा रोटरी स्कूलच्या क्रिकेट संघाचे स्पर्धेत यश निमगूळ, ता. २१ : टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन धुळे व हस्ती स्कूल ऑफ ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मानवमित्र स्व.कांतीलालजी जैन यांच्या जयंतीनिमित्त हस्ती स्कूलच्या मैदानावर झालेल्या सतरा वर्ष वयोगटातील धुळे जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि निवड चाचणीत दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. यातील पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत महिपाल राजपूत, नावेद बेलदार, सुमित राजपूत, तनिष्क पाटील, आदित राजपूत, आयुष्यमान वाडिले, सिद्धेश सोनार, विराट दयेकर, उदय ओतारी, रियांश राजपूत यांनी सर्वोत्तम गोलंदाजी आणि फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा जोरावर मर्यादित षटकांत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे आणि साक्री तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदविला होता. या संघाला कांतीलाल जैन स्मृती चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघातून धाराशिव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महिपाल राजपूत, नावेद बेलदार, सुमित राजपूत, आयुष्यमान वाडिले, सिद्धेश सोनार यांची निवड करण्यात आली. खेळाडूंना क्रीडाशिक्षक अजय हजारे, सुजय पवार, दिनेश सोनीस यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर, प्राचार्य श्रुतिरंजन बारिक, समन्वयक प्रशांत जाधव यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT