School Material Buying esakal
नाशिक

Nashik News: गणवेश, बूट खरेदीत विशिष्ट दुकानदाराची सक्ती नको! प्रशासनाधिकारी पाटील यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका शाळेतील शिक्षकांना वर्गात मोबाईल वापराची बंदी केल्यानंतर शिक्षण प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणवेश व बूट विशिष्ट दुकानदाराकडून खरेदी न करण्याचे आदेश दिले आहेत.

गणवेश व बूट स्वस्त दरात ज्या ठिकाणी मिळतील तेथूनच शाळेने खरेदी करावेत, असे आदेश मंगळवारी (ता. १२) शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे दुकानदारांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे. (Dont force particular shopkeeper to buy uniforms and shoes Order of Administrative Officer Patil Nashik News)

सर्व शिक्षा अभियानातून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व बूट मोफत पुरवले जातात. त्यांची खरेदी करण्यासाठी महापालिकेचे काही कर्मचारी विशिष्ट ठिकाणीच खरेदी करण्याचा आग्रह धरतात.

यातून दुकानदार व शाळा प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचे लागेबांधे जुडल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत.

त्या आधारे शिक्षण प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील यांनी मंगळवारी शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी सूचना देत त्यांना गणवेश व बूट खरेदीबाबत शासन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेऊनच खरेदी करण्याचे आदेश दिले.

ज्या ठिकाणी जास्त दर आकारला जात असेल, अशा ठिकाणी खरेदी न करण्याची सक्त सूचना त्यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

...म्हणून झाला निर्णय

विद्यार्थ्यांना याच दुकानातून गणवेश व बूट खरेदी करण्याचे ‘वरिष्ठां’चे आदेश असल्याचे काही कर्मचारी सांगत आहेत. याविषयी पत्र आणि फोनवरील संभाषण व्हायरल झाल्यामुळे विषय चर्चेत आला आहे.

त्याची जाहीर वाच्यता होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हे पत्र जारी केले आहे.

"गणवेश, बूट किंवा शालेय साहित्य खरेदीबाबत शासन निर्णय आहे. त्याअनुषंगाने आम्ही शाळांना हे आदेश दिले आहेत. त्याची शाळांनी अंमलबजावणी केली किंवा नाही याची तपासणी आम्ही करणार आहोत." - बी. टी. पाटील, शिक्षण प्रशासनाधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT