Phalke Smarak
Phalke Smarak esakal
नाशिक

Dadasaheb Phalke Memorial : फाळके स्मारकाच्या प्रवेश शुल्कात दुप्पट वाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर पांडव लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडे निधीची मागणी केली असताना दुसरीकडे स्मारकाच्या प्रवेश शुल्कात जवळपास दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला आहे. (Double increase in entrance fee of Dadasaheb Phalke Memorial nashik news)

महापालिकेकडून पाथर्डी शिवारातील पांडव लेण्यांच्या पायथ्याशी जवळपास २९ एकर जागेत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक उभारले आहे. स्मारकाची उभारणी झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात समाधानकारक उत्पन्न होते.

परंतु, स्मारकातील वॉटर पार्क, कॅन्टीन, तिकीट वसुली आदी बाबींचे खाजगीकरण होत गेले तसे स्मारकाचा खर्चदेखील वाढत गेला. महापालिकेसाठी पांढरा हत्ती पोसण्यासारखी परिस्थिती झाली. स्मारकाचा पुनर्विकास करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी महासभेवर प्रस्ताव ठेवला गेला.

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, सदर व्यवहार हा महापालिकेला परवडणारा नसल्याने तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या सूचना दिल्या.

आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात फाळके स्मारकाचा हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असतानाच आता महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे त्याचप्रमाणे स्मारकासाठी प्रतिदिन ७१ हजार रुपयांचा तोटा होत असल्याचे कारण देत स्मारकातील विविध सेवांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

विविध शुल्कामध्ये वाढ

स्मारकामध्ये प्रतिदिन ७१ हजार ८७४ रुपये तोटा येत असल्याने जवळपास प्रत्येक सुविधेमध्ये दुप्पट दरवाढ केली जाणार आहे. अठरा वर्षाच्या आत प्रवेश शुल्क पूर्वी पाच रुपये होते, ते आता दहा रुपये केले जाणार आहे. अठरा वर्षे पुढील प्रवेश शुल्क दहा रुपयांवरून वीस रुपये केले जाणार आहे.

दुचाकी वाहनतळासाठी पाच रुपयांऐवजी आता दहा रुपये मोजावे लागतील. तीन चाकी वाहनतळाचा दर पाच रुपयांवरून वीस रुपये केला जाणार आहे. चारचाकी वाहनतळाचा दर दहा रुपयांवरून वीस रुपये, तर बस वाहनतळ २० रुपयांवरून चाळीस रुपये केले जाणार आहे.

मिनी थिएटर वाहनतळासाठी एक हजार रुपये मोजावे लागतात. त्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. खुला रंगमंचसाठी हजार रुपये दर होता, तो आता दोन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.

कलादालन हॉलसाठी दोन हजार रुपये दर आहे, तो ४००० रुपये होईल. संपूर्ण परिसरात चित्रीकरणासाठी तीन हजार रुपये दर सध्या आहे. त्यात दुप्पट म्हणजे सहा हजार रुपये दरवाढ करण्याचा प्रस्ताव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT