SNR26B23524
नांदूरशिंगोटे ः फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध उपक्रमात सहभागी झालेले डी. पी. खर्डे नवजीवन फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
-------------------
३०-२
खर्डे नवजीवन फार्मसीला
नाशिक विभागात विजेतेपद
------------
सिन्नर, ता. १४ ः राज्य औषध व्यवसाय परिषदेतर्फे नाशिक विभागातून नांदूरशिंगोटे येथील डी. पी. खर्डे नवजीवन फार्मसी महाविद्यालयाचा जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त गौरव करण्यात आला. महाविद्यालयाने ‘असोसिएशन्स अँड इन्स्टिट्यूशन्स’ विभागातील ‘फार्मसी इन्स्टिट्यूट’ श्रेणीत नाशिक विभागातून विजेतेपद प्राप्त केले आहे.
फार्मसी क्षेत्रातील योगदान, जनजागृती आणि व्यावसायिक बांधीलकीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम आणि गौरवपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. हितेशकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, आरोग्यविषयक जनजागृती आणि फार्मसी व्यवसायाविषयी सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या यशामध्ये संस्थेचे व्यवस्थापन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सामूहिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. संस्थेच्या अध्यक्षा विजया देशमुख, व्यवस्थापकीय विश्वस्त सुभाष देशमुख, सचिव विजय काळे, संचालिका शिरीन देशमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. हितेशकुमार अग्रवाल, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव केला.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.