Officials saluting Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar at Muktibhumi Memorial. esakal
नाशिक

Dr. Ambedkar Jayanti : महामानवाला अभिवादनासाठी मुक्तीभूमीवर लोटली गर्दी..!

सकाळ वृत्तसेवा

Dr. Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर येथे भीम सैनिकांनी दर्शनासाठी गर्दी करून अभिवादन केले. (Dr Ambedkar Jayanti crowd flocked to Mukti Bhoomi to greet great man nashik news)

यावेळी स्थानिक प्रशासनातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, नवनियुक्त तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.

या वेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक नितीन खंडागळे, मुक्तीभूमी स्मारकाच्या व्यवस्थापिका, संशोधन अधिकारी पल्लवी पगारे, डॉ. भूषण शिनकर, चंद्रकांत निर्मळ, पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या वेळी त्रिशरण पंचशील व भीमस्तुती भीमस्मरण सुरक्षारक्षक पंचम साळवे यांनी घेतले. राष्ट्रवादीचे दीपक लोणारी, भूषण लाघवे, गोटू मांजरे, सुमीत थोरात, सुभाष गांगुर्डे, गणेश गवळी, संतोष राऊळ, नवनाथ पोळ, वाल्मीक कुमावत, अविनाश कुकर, सचिन सोनवणे आदींसह अशोक केदारे,

समाधान गरुड, आकाश अहिरे, पंचम साळवे, भाऊसाहेब पठारे, महेंद्र गरुड, महेंद्र हिरे, मंगेश साबळे, सिद्धार्थ त्रिभुवन, युवराज पगारे, छाया साबळे, चंदनशीव नंदा साठे आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, आज दिवसभरात मुक्तीभूमी स्मारकाकडे हजारों अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT