Women participating in the procession on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti. esakal
नाशिक

Dr. Ambedkar Jayanti : उत्सवाच्या सांगता मिरवणुकीत जयभीमचा गजर; तरुणाई उत्साहाच्या लाटेवर स्वार!

Women participating in the procession on the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti.

सकाळ वृत्तसेवा

Dr. Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सीबीएसजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर रीघ लागली होती.

जुन्या नाशिकमधील मोठा राजवाडा येथून सायंकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत एकोणीस चित्ररथ सहभागी झाले होते. सहभागी चित्ररथाद्वारे सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

मिरवणुकीत ढोल, लेसर शो, लाइव्ह व्हिडिओच्या धर्तीवर ‘जयभीम’चा गजर करत थिरकणारी तरुणाईने शोभायात्रेची रंगत वाढली. (Dr Ambedkar Jayanti Jayabhim alarm at closing procession of festival nashik news)

शालिमार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ शोभायात्रेची सांगता झाली. मोठा राजवाडा येथून सायंकाळी साडेसहाला शोभायात्रेस प्रारंभ झाला. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवत व पुष्पहार अर्पण करत मिरवणुकीस प्रारंभ झाला.

या वेळी माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, संजय साबळे, मामा राजवाडे, रामसिंग बावरी, आनंद सोनवणे, हेमलता पाटील, लक्ष्मी ताटे, अर्जुन पगारे, दिलीप साळवे, ज्ञानेश्‍वर काळे, राहुल बर्वे, शरद काळे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समितीतर्फे भगवंत पाठक यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मिरवणुकीत डॉल्बीच्या बेभान सुरांवर थिरकणारी तरुणाई उत्साहाच्या निळ्या लाटेवर स्वार झाली होती. मिरवणुकीत निळे झेंडे, गमजा, नीळ यांची रेलचेल होती. या वेळी जयभीमच्या घोषणा घुमत होत्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मोठा राजवाडा येथून निघालेली शोभायात्रा पुढे वाकडी बारव, दूध बाजार, संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, एमजी रोड, शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली.

आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह होता. बहुतांश मंडळांनी स्वतंत्र लाइट, डीजे किंवा डॉल्बी सिस्टिम वापरली होती. प्रखर झोतांचे लेझर दिव्यांच्या लखलखाटांमुळे उत्साह संचारला होता.

लाइव्ह व्हिडिओ वॉलही काही मंडळांनी लावले होते. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी विविध मंडळांनी स्वागत कक्ष उभे केले होते. याशिवाय अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी पाणी, सरबत वाटप केले जात होते.

अभिवादनास लोटली गर्दी

शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (ता.१३) मध्यरात्रीपासून तसेच शुक्रवारी सकाळपासून मोठी गर्दी उसळली होती.

सायंकाळी याच परिसरात शोभायात्रेची सांगता होणार असल्याने येथील वाहतूक वळविण्यात आली होती. अनेकांनी येथे सहकुटुंब सेल्फीचा आनंद लुटला. रात्री उशिरा या ठिकाणी शोभायात्रेची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT