Actor MP Amol Kolhe meeting with tanishka esakal
नाशिक

Dr. Amol Kolhe | शिवपुत्र संभाजी महानाट्याचा ‘तनिष्कां’नी करावा प्रचार- प्रसार : अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास उलगडणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून केवळ मनोरंजन नव्हे, तर नव्या पिढीपर्यंत खरा इतिहास पोचविण्याचा प्रयत्न आहे. येत्या २१ ते २६ जानेवारीपर्यंत रोज सायंकाळी सहाला या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन या महानाट्याचा प्रसार-प्रचार करावा.

विशेषतः आपल्या पुढील पिढीला हे महानाट्य आवर्जून दाखवावे, असे आवाहन महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेता खासदार अमोल कोल्हे यांनी येथे केले. (Dr Amol Kolhe statement at sakal satpur office Tanishka should promote Shivputra Sambhaji Mahanatya nashik news)

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या अनुषंगाने खासदार कोल्हे यांनी मंगळवारी ‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात तनिष्का भगिनी व ‘सकाळ’च्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी स्वागत केले. ‘सकाळ तनिष्का’ व्यासपीठाचे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी संयोजन केले.

दरम्यान, हे महानाट्य म्हणजे रोज वेगळा प्रयोग असे नसून, संभाजीराजांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतचे कथानक यामध्ये रोज बघावयास मिळणार असल्याचे स्पष्ट करून श्री. कोल्हे म्हणाले, की कोरोनाकाळानंतर नव्या पिढीचे आदर्श बदलले आहेत.

त्यांचे प्रबोधन करतानाच या महानाट्याच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचविणार आहोत. अगदी मुगले-आझमशी तुलना करता येईल, अशी ही भव्य-दिव्य कलाकृती असूनही तिकीटदरसुद्धा अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांना परवडतील असेच आहेत.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

कमी किमतीचे तिकीट काढले म्हणून शेवटच्या रांगेत बसणाऱ्या प्रेक्षकांनाही हा थरार अगदी जवळून अनुभवता यावा, यासाठी तब्बल दहा हजार प्रेक्षकांच्या मधून घोड्यावर बसून एन्ट्रीसारखे अनोखे प्रयोग या महानाट्यात बघावयास मिळतील.

त्यामुळे जीवनात एकदाच घ्यावयाचे जे अनुभव असतात, त्याच धर्तीवर हे महानाट्य म्हणजे सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभूती असेल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

एखाद्या मोठ्या समूहाने, शाळांनी किंवा अन्य कुणीही गटाने तिकिटे घेतल्यास त्यांच्यासाठी खास व्यवस्थादेखील करता येईल. त्यामुळे ‘तनिष्का’ भगिनींनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन एकत्रित तिकीट बुकिंग करावे, महानाट्याचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. ‘सकाळ तनिष्का’ व्यासपीठाच्या सदस्यांसह ‘सकाळ’चे सहकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT