फोटो : A15260
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची झालेली दुरावस्था.
--
कचरा, अंधार अन् नशेखोरांचा वावर
जुने नाशिक, ता. १८ : शहरात थंडीची चाहूल लागल्याने सकाळ-सायंकाळ शुद्ध हवा आणि व्यायामासाठी नागरिक उद्याने व जॉगिंग ट्रॅककडे वळू लागले आहेत. मात्र, जुने नाशिक परिसरातील एकमेव असलेल्या कथडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाली असून, हे उद्यान समस्यांचे माहेरघर बनले आहे.
या उद्यानाला लागूनच डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक विश्रांतीसाठी या उद्यानाचा वापर करत असत. परंतु, सध्याच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाईकांनीही या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. जुने नाशिक भागात स्वतंत्र जॉगिंग ट्रॅक नसताना एकमेव उद्यानही बंदिस्त व गैरसोयीचे झाल्याने आरोग्याची काळजी कशी घ्यायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या उद्यानाची स्वच्छता, सुरक्षा आणि दुरुस्ती करावी, अशी मागणी जुने नाशिककरांकडून होत आहे.
--
उद्यानातील प्रमुख समस्या
कचरा आणि अंधार : उद्यानात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले, पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य
चोरी, नशेखोरांचा वावर : ग्रीन जिमचे साहित्य चोरीला गेले आहे. तसेच, देखभाल नसल्याने नशेखोरांचा वावर वाढला
---कोट
जॉगिंग ट्रॅक नाही, तर परिसरातील एकमेव असलेल्या उद्यानाची दुरुस्ती करून रहिवाशांसाठी उद्यान खुले करून द्यावे.
- झुबेर हाश्मी, स्थानिक नागरिक
---कोट
अनेक वेळा पाठपुरावा करूनही उद्यानाच्या कामाकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे. यासाठी ग्रीन जिम बसवली; मात्र तीदेखील चोरी झाली आहे. त्वरित उद्यानाची दुरुस्ती करावी.
- अतुल क्षीरसागर, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.