Speaking in the program, Minister Dr. Bharti Pawar. Mayor Sharda Kapse, Vice President Anil Kunde on the platform esakal
नाशिक

Dr. Bharati Pawar News: निफाड ड्रायपोर्टसाठी 108 कोटींचा पहिला हप्ता जमा! मंत्री डॉ. पवार

सकाळ वृत्तसेवा

Dr. Bharati Pawar News : निफाड ड्रायपोर्टसाठी १०८ कोटींचा पहिला हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे जमीन खरेदीचा प्रश्न मार्गी लागेल. हा ड्रायपोर्ट शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणारा हा प्रकल्प आहे.

निसाकावर होणारा ड्रायपोर्ट हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे मी पंतप्रधानांना सांगितले आहे,

तर ड्रायपोर्ट माझा संकल्प असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी बुधवारी (ता. ४) येथे दिली. (Dr Bharati Pawar statement First installment of 108 crore deposited for Niphad Dryport nashik)

तालुकास्तरीय अमृतकलश यात्रा बुधवारी (ता. ४) निफाड शहरातून काढण्यात आली. वैनतेय विद्यालयात यात्रेचा समारोप झाला. तेथे मुख्य कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर शारदा कापसे, अनिल कुंदे, शंकर वाघ, तहसीलदार घोरपडे, गटविकासाधिकारी पाटील, मुख्याधिकारी चौधरी, न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त वि. दा. व्यवहारे, सुनील पवार आदी होते.

डॉ. पवार म्हणाल्या, की ‘मेरी मिट्टी-मेरा देश’ अभियानातून राष्ट्रीय एकात्मता, देशाप्रती प्रेम, समर्पणाची भावना वाढीस लागेल. देशभरातून जमा होणाऱ्या अमृत कलशातील मातीपासून देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांसाठी दिल्लीत अमृतवाटिका साकारणार आहे. अमृतवाटिकेत माझ्या गावातील माती आहे, याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला असणार आहे.

यात्रेचा प्रारंभ निफाड पंचायत समिती कार्यालयापासून झाला. यात्रेत वैनतेय विद्यालय, वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांची वेशभूषा केली होती. यात्रेच्या प्रारंभी वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक होते.

यात्रेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, नगराध्यक्ष शारदा कापसे, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकासाधिकारी महेश पाटील, पोलिस उपअधीक्षक नीलेश पालवे, मुख्याधिकारी अमोल चौधरी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार आदी सामील झाले होते.

गटविकासाधिकारी पाटील यांनी प्रास्तविकात अमृतकलश यात्रेचा उद्देश सांगितला. सुनील पवार, विश्वास कराड, मधुकर राऊत, साहेबराव बर्डे, केशव सुरवाडे, गणेश कातकाडे, नंदकुमार कापसे, अमोल वडघुले, संजय गाजरे, गौरव वाघ, सचिन धारराव, चंद्रकांत सांगळे आदींसह विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. सविता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT