पान-३
YEO26B27541
नागपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मास्टकॅन व ''इमाकॅन परिषदेत डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांना पुरस्कार प्रदान करताना पदाधिकारी.
--------------
डॉ. क्षत्रिय यांना ''बेस्ट प्रेसिडेंट'' पुरस्कार
नागपूर येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परिषदेत सन्मान, मंत्री बावनकुळेची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१६ : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेतर्फे येथील शाखाध्यक्ष व प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांना प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड बेस्ट प्रेसिडेंट या राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, सामाजिक कार्य आणि आयएमएच्या संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
आयएमएतर्फे नागपूर येथे ''मास्टकॅन-२०२६'' व ''इमाकॅन-२०२६'' वार्षिक परिषद झाली, त्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत डॉ. क्षत्रिय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोहळ्यास आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई उपस्थित होते.
डॉ. क्षत्रिय यांनी आधुनिक स्त्रीरोग उपचार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि वंध्यत्व निवारण उपचार उपलब्ध करून देत वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देतानाच त्यांनी सामाजिक बांधीलकीही जपली आहे. वैद्यकीय सेवेसोबतच क्रिकेटची आवड, चित्रपटांतील भूमिका, डॉक्टरांना मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. येवला शाखेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात डॉक्टरांचे वैद्यकीय प्रश्न सोडविण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान झाला. पत्नी भूलतज्ज्ञ डॉ. दीपाली क्षत्रिय यांच्यासोबत त्यांनी पुरस्कार स्वीकारला. आजपर्यंत केलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याची ही पावती असून या कामाचा हा सर्वोत्तम गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.