Dr. Malvika Tambe esakal
नाशिक

Seminar : आई-बाबा व्हायचंय? ‘सेफ’ एक पर्याय; डॉ. मालविका तांबे यांचा 21ला कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये परिसंवाद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गर्भधारणा हा विषय इतका नाजूक आहे, की सहसा या विषयाची चर्चाच कुठे होताना आपल्याला दिसत नाही. नवरा-बायको व त्यांच्या घरचे सदस्य आणि डॉक्टरच्या त्या क्लिनिकमधल्या त्या छोट्या चेंबरमध्ये याबद्दलची सगळी चर्चा होताना आपल्याला दिसते. ‘आई-बाबा व्हायचं आहे?’ ही चर्चा न होता किंवा स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात असावं, यासाठी ‘सेफ’ हा पर्याय घेऊन आलो आहोत.

‘सेफ’ म्हणजे नेमके काय? वंध्यत्व ते नैसर्गिक गर्भधारणेसाठी काय काळजी घ्यायला हवी? या सर्वांचे उत्तर मिळणार आहे ते शनिवारी (ता. २१) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा हॉलमध्ये सायंकाळी सहाला डॉ. मालविका तांबे यांच्या परिसंवाद व मार्गदर्शन कार्यक्रमात. (Dr Malvika Tambe Seminar at Kusumagraj Pratishthan on 21st january nashik news)

‘सेफ’ हे एका पॅरेंटिंग बडी सारखं आहे, म्हणजे आपला एखादा मित्र कसा आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मदत करतो तशाप्रकारे ‘सेफ’ प्रत्येक दांपत्याला मदत करणार आहे. बाळ होत नसेल तर त्या अडचणींवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो किंवा अडचणी काही नसल्या, पण व्यवस्थित तयारी करून जर बाळ व्हायला प्रयत्न करायचे असतील त्याच्या करताही ‘सेफ’ हे मदत करू शकतं.

याच्यामध्ये बीजशुद्धी ही सर्वांत महत्त्वाची असते. कारण आपले स्पर्म्स व ओवम व्यवस्थित असले तर सुदृढ बालक जन्माला येऊ शकतं. यामध्ये काय खायला- प्यायला पाहिजे, कोणत्या रसायनांचा फायदा होईल, तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही कोणती काळजी तुमच्या दिनचर्येत व आहारात घेतली पाहिजे हे सर्व सांगितले जाणार आहे.

खरंतर एकमेकांच्या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळू शकतं आणि बऱ्याच शंकांचं निरसन होऊ शकतं. त्यामुळे या परिसंवादामध्ये फर्टिलिटीशी संबंधित सगळ्या पैलूंवर चर्चा होणार आहे. या परिसंवादाला बाळ होण्याची इच्छा असणाऱ्या सगळ्याच दांपत्यांनी यायला पाहिजे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

कारण त्यामुळे बऱ्याच गोष्टी समजायला मदत होईल, तसेच त्यांच्या जवळची लोकं, नातेवाईक, मित्रमंडळी त्यांनीही या परिसंवादाला यायला हरकत नाही. कारण समाजामध्ये कुठे, कोणाला त्रास होत असेल तर आपल्याला त्याविषयी व्यवस्थित जागरूकता असली, माहिती असली तर कोणाला तरी सल्ला देऊ शकतो.

त्यामुळे प्रत्येकाने या परिसंवादाला आले पाहिजे आणि ‘सेफ’ ही संकल्पना समाजामध्ये रुजू करावी. जेणेकरून पुढे येणारी पिढी ही सुदृढ, निरोगी आणि हुशार असेल. प्रवेश विनामूल्य असून, जागा आरक्षित करण्यासाठी आपले नाव, नंबर, ईमेल व्हॉट्स‌ॲप करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT