MLA Devyani Farande inaugurating the Namo Cup cricket tournament by batting. Along with various dignitaries. esakal
नाशिक

Nashik NAMO Chashak : नमो चषक स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्मिती : डॉ. राहुल रनाळकर

खेलो भारतच्या माध्यमातून भारत देश जगात खेळाच्या क्षेत्रातही महासत्तेकडे वाटचाल करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NAMO Chashak : खेलो भारतच्या माध्यमातून भारत देश जगात खेळाच्या क्षेत्रातही महासत्तेकडे वाटचाल करत आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाचे महत्त्व वाढत असताना स्थानिक पातळीवरही प्रत्येकामध्ये क्रीडा भावना रुजत आहे. (Dr Rahul Ranalkar statement of Production of International Players from Namo chashak Competition nashik news)

नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून भरविलेल्या नमो चषक स्पर्धेतूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी व्यक्त केला.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. रनाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, नरेडकोचे सचिव सुनील गवांदे, नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा.

सचिव समीर रकटे, स्पर्धेचे संयोजक सुनील फरांदे, अमोल गांगुर्डे, चंद्रकांत थोरात, नाना सूर्यवंशी, माजी नगरसेविका अर्चना थोरात, संगीता जाधव, तेजश्री काठे, रोहिणी रकटे, सचिन गायकवाड, ऋषिकेश शिरसाट, वसंत उशीर, राजेंद्र यशोध, ॲड. मीनल भोसले, श्याम बडोदे, सचिन पाटील आदी यावेळी उपस्थित होते. पोलिस उपायुक्त चव्हाण यांनी खेळाडूंच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा भरविणे आवश्यक असल्याचे सांगताना आमदार फरांदे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT